जाहिरात

Nagpur News: मोठी बातमी: 'या' जिल्ह्यात पेट्रोल पंपावर ऑनलाईन पेमेट बंद! डीलर असोसिएशनचा निर्णय

या निर्णयामुळे भविष्यात पेट्रोल पंपांवर ऑनलाईन पेमेंट बंद होणार असल्याने ग्राहकांची चांगलीच पंचाईत होणार आहे.

Nagpur News: मोठी बातमी: 'या' जिल्ह्यात पेट्रोल पंपावर ऑनलाईन पेमेट बंद! डीलर असोसिएशनचा निर्णय

संजय तिवारी, नागपूर: राज्यातील पेट्रोल डिझेल ग्राहकांसाठी एक सर्वात मोठी, महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. येत्या काही काळात सर्व महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल पंपावर ऑनलाईन पेमेंट्स बंद होऊ शकतात. आणि याची सर्वात नागपूर पासून होत आहे. या निर्णयामुळे भविष्यात पेट्रोल पंपांवर ऑनलाईन पेमेंट बंद होणार असल्याने ग्राहकांची चांगलीच पंचाईत होणार आहे.

(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आता राज्यातील पेट्रोल डिझेल ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी. येत्या काही काळात सर्व महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल पंपावर ऑनलाईन पेमेंट्स बंद होऊ शकतात. आणि याची सर्वात नागपूर पासून होत आहे. नागपूरच्या पेट्रोल आणि डिझेल पंपावर येत्या 10 मे पासून डिजिटल ऑनलाईन पेमेंट्स स्वीकारले जाणार नाहीत. विदर्भ पेट्रोल असोसिएशने हा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

या मागे कारण म्हणजे बँकांनी काही ऑनलाईन खात्यातून अशा पद्धतीने  पंप संचालकांच्या खात्यात पेमेंट्स आल्याने चक्क पेट्रोल पंप संचालकांची लाखोंची रक्कम गोठवली आहे किंवा काही प्रकरणांमध्ये पूर्ण बँक खातीच गोठविली असून त्यांची आर्थिक पंचाईत झाली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार दाखल करूनही उपयोग झालेला नाही. त्यामुळे आता याचा परिणाम ग्राहकांवर होणार हे निश्चित झाले आहे.

नक्की वाचा - Badlapur News : बदलापूरकरांच्या डोक्याला 'ताप'; रेल्वेच्या तिकीट खिडकीमुळे मनस्ताप

 सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे पेट्रोलपंप धारकांच्या बँक खात्यातील रक्कम गोठवली जात असल्याने विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला. सद्यस्थितीत देशभरात डिझिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेतात. काही प्रकरणांमध्ये तर संपूर्ण बँक खातीच गोठवण्यात आली आहेत. संबंधित खात्यांतील रक्कम गृहमंत्रालयाच्या आदेशा शिवाय परत मिळवता येत नाही.

ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून, सायबर क्राइम विभागाकडे तक्रार देऊनही अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या समस्येचे लवकरात लवकर समाधान झाले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल पेमेंट बंद करण्याचा विचार संघटना करत आहे. दरम्यान, डिजिटल इंडियासाठी आग्रही असलेल्या सरकारकडून या निर्णयासंबंधी कोणती भूमिका घेतली जाते हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

नक्की वाचा - Pahalgam Attack : भारताकडून पाकिस्तानची आर्थिक कोंडी; आयात आणि निर्यातीवर तात्काळ बंदी