Repo Rate Cut : सर्वसामान्यांना मोठा दिलासा; रेपो दरात कपात, बँकांचे कर्ज स्वस्त होणार?

Repo Rate : रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीमध्ये रेपो दरात कपात केली होती. आरबीआयने रेपो दरात 0.25 टक्के कपात केली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

महागाईने बेजार झालेल्या नागरिकांना रिझर्व्ह बँकेने काहीसा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. कर्जदारांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. रेपो दरात 0.25 टक्क्यांच्या दर कपातीनंतर दर 6.25 वरुन 6 टक्के झाला आहे. 

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या (MPC) बैठकीत एकमताने दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 7 ते 8 फेब्रुवारी दरम्यान ही बैठक पार पडली. रिझर्व्ह बँकेने नवीन आर्थिक वर्षात पहिल्याच महिन्यात ही कपात केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

फेब्रुवारी महिन्यात रेपो दरात कपात

रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीमध्ये रेपो दरात कपात केली होती. आरबीआयने रेपो दरात 0.25 टक्के कपात केली होती. फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदर 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. ही कपात सुमारे 5 वर्षांनी करण्यात आली होती.

(नक्की वाचा-  CNG-PNG Price Hike : सर्वसामान्यांना आणखी एक झटका; सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ)

रेपो दर म्हणजे काय?

रेपो दर हा व्याज दर आहे ज्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देशातील इतर बँकांना कर्ज देते. रेपो दर वाढला की बँकांना महागड्या दराने कर्ज मिळते. त्याच वेळी, जेव्हा रेपो दरात कपात केली जाते, तेव्हा बँकांना आरबीआयकडून स्वस्त दरात कर्ज मिळू शकते.

Advertisement

(नक्की वाचा - Hajj 2025 : सौदी अरेबियानं भारतासह 14 देशांच्या नागरिकांच्या व्हिसावर बंदी का घातली?)

रेपो दर कमी झाल्यास फायदा काय?

रेपो दर कमी झाल्यानंतर बँका होम लोन आणि कार लोन यांसारख्या कर्जांवरील व्याजदर देखील कमी करू शकतात. तुमचे सर्व कर्ज स्वस्त होऊ शकतात आणि ईएमआय देखील कमी होईल. जर व्याजदर कमी झाले तर घरांची मागणी वाढेल. अधिक लोक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकतील.

Topics mentioned in this article