SBI Report : रेपो रेट 175 अंकांनी कमी होणार? कर्जे सॉलिड स्वस्त होणार? SBI अहवालात काय?

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटलंय की, जून आणि ऑगस्टच्या पहिल्या सहामाहीमध्ये रेपो रेट 75 बेसिस पॉइंटनी तर दुसऱ्या सहामाहीमध्ये 50 बेसिस पॉइंटनी कमी केला जाऊ शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

SBI Repo Rate Report : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये येत्या काळात रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये मोठी कपात करण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये आरबीआय आक्रमक व्याज दर कपात करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महागाई नियंत्रणात असल्याने हे शक्य असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटलंय की, जून आणि ऑगस्टच्या पहिल्या सहामाहीमध्ये रेपो रेट 75 बेसिस पॉइंटनी तर दुसऱ्या सहामाहीमध्ये 50 बेसिस पॉइंटनी कमी केला जाऊ शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे एकूण मिळून 125 अंकांची रेपो रेटमध्ये कपात होऊ शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Advertisement

(नक्की वाचा-  Mobile App : पाच सरकारी अ‍ॅप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवेत! काय होईल फायदा?)

CPI Inflation (ग्राहक मूल्य निर्देशांक) 67 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर म्हणजेच 3.34 टक्क्यांवर आला आहे. हा निर्देशांक वस्तू आणि सेवांच्या किमतींमध्ये होणाऱ्या बदलांवर आधारित असतो आणि तो सामान्य कुटुंबांनी खरेदी केलेल्या वस्तू आणि सेवांच्या किमतींमध्ये बदल दर्शवत असतो. खाद्यपदार्थांची चलनवाढ ही नियंत्रणात असल्याने ग्राहक मूल्य निर्देशांक खाली येण्यास मदत झाली आहे. ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर रेपो रेट कमी करण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याचे मत एसबीआयने नोंदवले आहे. 

Advertisement

येत्या काळात 150-175 अंकांनी  रेपो रेट कमी होऊ शकतो असा अंदाज आहे. जर रिझर्व्ह बँकेने 50 बेसिसि पॉईंटने रेपो रेट कमी केला तर आरबीआयकडून दिला गेलेला तो सगळ्यात मोठा सकारात्मक संकेत असेल असे या अहवालात म्हटले आहे. 

Advertisement

(नक्की वाचा- ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू)

एसबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2026मध्ये महागाई वाढीचा दर हा 4 टक्क्यांच्या खाली राहण्याची शक्यता आहे. पहिल्या चार महिन्यात हा दर 3 टक्क्यांच्याही खाली राहण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे. अन्नधान्यांच्या किंमती अचानक भडकण्याची शक्यता कमी असल्याचेही अहवालात म्हटले आहे. हे सगळे आकडे आणि अंदाज चांगले वाटत असले तरी त्याची एक चिंताजनक बाबही आहे. एकीकडे कर्ज स्वस्त होत असताना दुसरीकडे बँकेतील ठेवींवरील व्याज दरही कमी होणार आहे, ज्यामुळे ग्राहक बँकांमधील ठेवी कमी करतील अशी भीती नाकारता येत नाही.

Topics mentioned in this article