जाहिरात

Salary Hike News : 60 हजार पगार असणाऱ्यांची सॅलरी किती वाढणार? EY चा रिपोर्ट, कोणत्या क्षेत्रात किती पगारवाढ?

Salary Increment News: पगारवाढ केवळ वार्षिक वाढीवर अवलंबून नसेल, तर पगारवाढ कौशल्यांच्या आधारावर होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामासंबंधित कौशल्ये शिकणे, वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.

Salary Hike News : 60 हजार पगार असणाऱ्यांची सॅलरी किती वाढणार? EY चा रिपोर्ट, कोणत्या क्षेत्रात किती पगारवाढ?
Salary Hike News: यंदाच्या वर्षी पगार किती वाढणार?

Salary Hike News  : दरवर्षी मार्च महिना येताच नोकरदार वर्गामध्ये एकच चर्चा सुरू असते ती म्हणजे पगारवाढीची. टेक्नॉलॉजीपासून फायनान्स आणि ई-कॉमर्सपर्यंत वेगवेगळ्या सेक्टरमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चांगल्या पगारवाढीची अपेक्षा असते. जर तुम्हीही त्यापैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एका रिपोर्टनुसार, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये यंदाच्या वर्षी साधारण ९.१ टक्के पगारवाढीची अपेक्षा आहे. असं घडलं तर ५०,००० रुपये महिना पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहिना ४,५०० रुपये आणि वर्षाला ५४,००० रुपये अधिक लाभ होऊ शकतो.

कोणत्या क्षेत्रात किती पगारवाढीची अपेक्षा?

यंदाच्या वर्षी GCC म्हणजेच ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरमध्ये सर्वाधिक पगारवाढीची अपेक्षा आहे. तर डिजिटल आणि टेक्नॉलॉजी, वित्तीय सेवा, फार्मासारख्या क्षेत्रात तब्बल १० टक्के पगारवाढीची अपेक्षा आहे. EY इंडियाच्या फ्यूचर ऑफ पेच्या रिपोर्टनुसार, ग्लोबल कॅपॅबिलिजी सेंटर पगारवाढीत महत्त्वाची भूमिका निभावतील.

  • जागतिक मागणी मजबूत राहिल्याने GCC मध्ये वेतन वाढ सरासरी १०.४% असू शकते.
  • आर्थिक सेवा क्षेत्रात तब्बल १० टक्के पगारवाढीची शक्यता आहे.
  • ई-कॉमर्स क्षेत्रात ९.९ टक्के पगारवाढीची अपेक्षा आहे.
  • लाइफ सायन्सेज आणि फार्मास्यूटिकल क्षेत्रात ९.७ टक्क्यापर्यंत पगारवाढीची अपेक्षा आहे.

एआय, जनरेटिव्ह एआय, मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा आणि क्लाउड कॉम्प्युटिंग यासारख्या क्षेत्रातील तज्ज्ञांना ३० ते ४०% जास्त पगार मिळू शकतो.

याशिवाय वेरिएबल पे चे महत्त्वही वाढत आहे. २०२५ मध्ये फिक्स्ड पगाराच्या तुलनेत सरासरी वेरिएबल पे चा भाग वाढून १६.१ टक्के झाला असून हा एक वर्षापूर्वी १४.८ टक्के होता.

नोकरी सोडणाऱ्यांचं प्रमाण झालं कमी...

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, नोकरी सोडणाऱ्यांचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे. २०२५ मध्ये एकूण एट्रिशन दर कमी होऊन १६.४ टक्के आहे. जो २०२४ मध्ये १७.५ टक्के होता. यावरुन नोकऱ्यांचं मार्केट यापूर्वीपेक्षा अधिक स्थिर झालं आहे.

८० टक्क्यांहून अधिक कर्मचारी आपल्या इच्छेने नोकरी सोडत आहेत. याचा अर्थ लोक नोकरी कपातीमुळे नाही तर चांगल्या संधीच्या शोधात नोकऱ्या बदलत आहेत.

आर्थिक सेवा क्षेत्रात सर्वाधिक २४ टक्के एट्रिशन दाखल करण्यात आलं आहे. तर व्यावसायिक सेवा आणि हाय-टेक, आयटी क्षेत्रातही नोकरी सोडण्याचं प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त राहिलं आहे. याच्या तुलनेत जीसीसीमध्ये एट्रिशनचा दर अपेक्षेच्या तुलनेत कमी, म्हणजे साधारण १४.१ टक्के आहे.

नक्की वाचा - Arsyan Ismail: 300 रुपयांची गुंतवणूक अन् 634 कोटींची कमाई! मलेशियन उद्योजक मालामाल, नेमकं काय घडलं?

गुणवत्तेच्या आधारावर पगारवाढ...

ईवाई इंडियामध्ये एकूण रिवॉर्ड्स, HR टेक्नॉलॉजी आणि लर्निंग पार्टनर आणि लीडर अभिषेक सेनने सांगितलं की, कंपन्या आता प्रतिभावान उमेदवारांमध्ये गुंतवणूक करण्याच्या पद्धतीवर पुन्हा विचार करीत आहे. पगाराचं भविष्य केवळ वार्षिक वाढीच्या आकारावर अवलंबून नाही, तर कोणत्या कौशल्यांना पुरस्कृत केलं जातं आणि स्पर्धात्मकता आणि दीर्घकालीन शाश्वतता कशी संतुलित करायची यावर देखील अवलंबून आहे, असं ते म्हणाले.

रिपोर्टनुसार, आता कौशल्य-आधारित वेतन प्रणालीच्या दिशेने मोठा बदल पाहायला मिळत आहे. सर्व्हेमध्ये सामील साधारण सर्व कंपन्या पारंपरिक पदआधारित पगाराची रचना बदलून कौशल्यावर आधारित पद्धतीचा अवलंब करीत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com