मलेशियाई टेक उद्योजक अर्श्यान इस्माइल यांनी नुकताच AI.com हा प्रीमियम डोमेन तब्बल 70 कोटी डॉलर्स (सुमारे 634 कोटी रुपये) विकून इंटरनेट जगतात एक नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी हे डोमेन 1993 मध्ये अवघ्या 100 डॉलर्समध्ये (तेव्हाचे सुमारे 300-800 रुपये) नोंदवले होते. त्यांनी 32 वर्षांपूर्वी बालपणात नोंदवलेले AI.com हे डोमेन आज जगातील सर्वात महागड्या विकल्या गेलेल्या डोमेनपैकी एक ठरले आहे.
योगायोग की दूरदृष्टी?
अर्श्यान यांनी जेव्हा 1993 मध्ये हे डोमेन खरेदी केले, तेव्हा ते अवघ्या 10 वर्षांचे होते. त्यांना भविष्यातील 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या (AI) क्रांतीचा अंदाज नव्हता. त्यांनी हे नाव निवडले कारण 'AI' ही त्यांच्या नावाची आद्याक्षरे (Arsyan Ismail) होती. त्यांनी आपल्या आईच्या क्रेडिट कार्डचा वापर करून हे डोमेन नोंदवले. त्यावेळी त्यांच्या आईला 'डोमेन' म्हणजे काय हे देखील ठाऊक नव्हते आणि कार्डवरील चार्ज पाहून त्यांनी अर्श्यान यांना रागावले देखील होते.
(नक्की वाचा- Ajit Pawar Plane Crash VIDEO: अजित पवारांच्या अपघाताचं नवीन CCTV Footage, विमानतळावर नेमकं काय घडलं?)
विक्रीचा मोठा व्यवहार
एप्रिल 2025 मध्ये अर्श्यान यांनी हे डोमेन Crypto.com चे CEO क्रिस मार्सझालॅक यांना 70 कोटी डॉलर्सना विकले. हा संपूर्ण व्यवहार क्रिप्टोकरन्सी स्वरूपात पार पडला. हे डोमेन अलीकडेच 'सुपर बाउल LX' दरम्यान पुन्हा लाँच करण्यात आले. Crypto.com आता याचा वापर "Agentic AI" प्लॅटफॉर्मसाठी करत आहे, जिथे युजर्स स्वतःचे वैयक्तिक AI एजंट तयार करू शकतात.
अर्श्यान इस्माइल यांचा टेक प्रवास
अर्श्यान हे मलेशियाच्या टेक इकोसिस्टममधील एक महत्त्वाचे नाव आहेत. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅममधून संगणक शास्त्रात पदवी घेतली आहे. त्यांनी सुरुवातीला Nuffnang आणि Friendster सारख्या प्रसिद्ध प्लॅटफॉर्मवर काम केले. त्यानंतर त्यांनी स्वतःची 1337 Tech ही कंपनी स्थापन केली.
(नक्की वाचा- Ajit Pawar Death: पटेल, तटकरे, अरोरा... रोहित पवार नाव न घेता स्पष्टच बोलले, नव्या दाव्यांनी खळबळ)
अर्श्यान हे केवळ या डोमेनचे मालक नाहीत, तर त्यांच्याकडे जगातील सर्वात लहान ईमेल आयडी (a@a.ai) आणि सर्वात लहान URL (g.gg) देखील आहे. तसेच, त्यांच्याकडे मलेशिया आणि न्यूयॉर्कमधील अत्यंत दुर्मिळ 'व्हॅनिटी' फोन नंबर्स देखील आहेत.