शेअर बाजारातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. शेअर बाजारात F&O ट्रेडिंग करणाऱ्या 100 पैकी 93 किरकोळ गुंतवणूक दारांना नुकसान सहन करावं लागतं. गुंतवणूकदारांच नुकसान टाळण्यासाठी सेबीकडून वेळोवेळी त्यांना सावध केलं जातं.
याआधी जुलै महिन्यात सेबीने एक रिपोर्ट जारी केला होता. ज्यामध्ये म्हटलं होतं की, F&O मध्ये 89 टक्के गुंतवणूक पैसे गमावतात. मात्र आता हा टक्का वाढून 93 टक्क्यांवर पोहोचला आहे.
(नक्की वाचा- दीड लाख पगार, विदेशात नोकरी; देशभरातून आलेल्या तरुणांची गर्दी पाहून पुणेकर अचंबित)
सेबीच्या नवीन रिपोर्टमध्ये काय आहे?
- आर्थिक वर्ष 2022 आणि 2024 दरम्यान 93 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांना इक्विटी F&O मध्ये नुकसान झालं आहे.
- किरकोळ गुंतवणूकदांचं नुकसान तीन वर्षात वाढून 1.8 लाख कोटींवर पोहोचलं आहे.
- इक्विटी F&O सेगमेंटमध्ये 10 पैकी 9 गुंतवणूकदारांना सतत तोटा होत आहे.
- 2022 ते 2024 या आर्थिक वर्षात 93 टक्के गुंतवणूकदारांना सरसरी 2 लाख रुपये प्रतिव्यक्ती नुकसान झालं आहे.
- 4 लाख गुंतवणूकदारांना 2022 ते 2024 या आर्थिक वर्षात 28 लाख रुपये प्रतिव्यक्ती नुकसान झालं आहे.
- केवळ 1 टक्के गुंतवणूकदारांना 2022 ते 2024 या आर्थिक 1 लाख रुपयांहून अधिकता नफा झाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रोप्रायरिटी ट्रेडर्स आणि FPIs नफ्यात
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये वैयक्तिक गुंतवणूकदारांना 61 हजार कोटींहून अधिकचा तोटा झाला आहे. या दरम्यान प्रोप्रायटरी ट्रेडर्सना 33 हजार कोटी रुपये आणि फॉरेन पोर्टफोलियो इन्वेस्टीसना 28 हजार कोटींचा नफा झाला.
(नक्की वाचा : महिलांनो, 'लाडक्या बहिणी'सह 3 सरकारी योजनांचा घ्या फायदा, घरबसल्या करा लाखोंची कमाई )
रिपोर्टनुसार, फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्या 30 वर्षाखालील तरुणांची संख्या आर्थिक वर्ष 2023 मध्ये 31 टक्क्यांवरून 2024 मध्ये 43 टक्क्यांपर्यंत वाढली. फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग करणारे 72 टक्क्यांपेक्षा जास्त ट्रेडर्स हे टॉप 30 शहरांबाहेरचे होते. तर या शहरांमधील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांचा वाटा 62 टक्के आहे.