कमी किमतीत टाटा मोटर्सच्या कार खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण टाटा मोटर्सने जानेवारी 2025 पासून लाइनअप असलेल्या वाहनांच्या किमती वाढविण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच केवळ 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही सद्याच्या किमतीत कार बुक करू शकता.
सातत्याने महागणाऱ्या लॉजिस्टिक आणि एकूणच महागाईमुळे वाहनांच्या किमतीत वाढ केली जात आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सर्व वाहनांच्या शोरुमच्या किमतीत साधारण तीन टक्क्यांपर्यंत वाढ केली जात आहे. मात्र कोणत्या कार मॉडेलच्या किमतीत किती टक्क्यांनी वाढ होईल याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. हे वेगवेगळे मॉडेल आणि त्यांच्या व्हेरियंटवर अवलंबून असेल.
टाटा मोटर्सशिवाय मारुती सुझुकी, हुंडई, किआ, एमजी मोटर्स आणि महिंद्रानेही जानेवारीपासून वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किमतीत चार टक्क्यांनी वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे. तर हुंडई वाहनांच्या किमतीत २५ हजारांनी वाढ करण्यात येणार आहे. याशिवाय एमजी मोटर तीन टक्के आणि किआ इंडिया आपल्या वाहनांच्या किमतीत दोन टक्क्यांनी वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे. या सर्व कंपन्यांनी इनपुट किंमत आणि महागाईचही कारण दिलं आहे.
इलेक्ट्रिक कार होणार महाग...
टाटा मोटर्स सध्या इलेक्ट्रिक व्हिकल सेग्मेंटचा लीडर झाला आहे. कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये टिएगो ईव्ही, टिगोर ईव्ही, नेक्सन ईव्ही, पंच ईव्ही आणि कर्व्ह इव्हीसह अनेक इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. या सर्व वाहनांच्या किमतीत वाढ होणार असल्याची माहिती आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात पॅसेंजर कार सेग्मेंटमध्ये टाटा मोटर्सने दोन टक्क्यांची वाढ केली होती. कंपनीने या महिन्यात ४७,११७ युनिट्सची विक्री केली आहे. जो गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ४६,१४३ युनिट्स होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world