Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सरकारचा विकासदर वाढवणे, सर्वांचा विकास, मध्यम वर्गीयाची क्षमता वाढविण्यासाठी समर्पित आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सांगितलं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयकरदात्यांना खूशखबर..
निर्मला सीतारमण यांनी आयकरदात्यांना खूश करणारी घोषणा केली आहे. दरमहिन्याला एक लाख रुपये कमाई करणाऱ्याला कर भरावा लागणार नाही. 12.75 लाखांपर्यंत आयकरावर कोणताही कर लागणार नाही. आता गेल्या चार वर्षांचं आयटी रिटर्न एकत्रितपणे भरू शकता. अर्थमंत्री यांनी मोठी घोषणा करीत 12 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. हा बदल नव्या टॅक्स रिजिमनुसार करण्यात आली आहे. यापूर्वी सात लाखांच्या कमाईवर कोणताही टॅक्स लागू नव्हता.
नक्की वाचा - Union Budget 2025: देशाचा अर्थसंकल्प सादर! काय स्वस्त काय महाग? वाचा एका क्लिकवर...
विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा एक लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. सध्याच्या आयकर कायद्याच्या जवळपास निम्म्या आकाराचे असेल. नवीन आयकर कायदा सुलभ आणि समजण्यास सोपा असेल. नवीन आयकर विधेयकामुळे TDS प्रक्रिया अधिक तर्कशुद्ध आणि सुटसुटीत केली जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 1 लाखापर्यंत वाढवली. भाड्यावर टीडीएससाठी 2.4 लाख रुपयांची वार्षिक मर्यादा 6 लाख रुपये करण्यात आली. टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठीची मुदत 2 वर्षांवरून 4 वर्षांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world