जाहिरात

Budget 2025 : केंद्रीय बजेटवरही जाणवणार 'ट्रम्प इफेक्ट'! अर्थमंत्री घेऊ शकतात मोठा निर्णय

Budget 2025 : केंद्रीय बजेटवरही जाणवणार 'ट्रम्प इफेक्ट'! अर्थमंत्री घेऊ शकतात मोठा निर्णय
मुंबई:

Union Budget 2025 : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्विकारल्यानंतर निर्णयाचा धडका लावलाय. त्यांच्या निर्णयाचे परिणाम जगात जाणवत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman )  1 फेब्रुवारी रोजी अर्थकंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पावरही 'ट्रम्प इफेक्ट' जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय होणार बदल?

भारतामध्ये अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवरील आयात कर कमी होण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात होऊ शकतो. भारतामध्ये अमेरिकेतून स्टील, महागड्या मोटारसायकल, इलेक्ट्रॉनिक्स साहित्यासह एकूण 20 वस्तू आयात केल्या जातात. या वस्तूंवर 100 टक्के पेक्षा जास्त कर लावला जातो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार भारताच्या या निर्णयानं देशांतर्गत उद्योगांवर कोणाताही परिणाम होणार नाही. 

NDTV प्रॉफिटला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, चीन आणि ब्राझील या देशांचं 'जबरदस्त टॅरीफ मेकर्स' म्हणून वर्णन केलं होतं. त्यानंतर ही बातमी आली आहे. हे तीन्ही देश BRICS गटाचे संस्थापक सदस्य आहेत. 

Budget 2025 Date : बजेटची तारीख आणि वेळ का बदलण्यात आली? तुम्हाला माहिती आहे का कारण?

( नक्की वाचा :  Budget 2025 Date : बजेटची तारीख आणि वेळ का बदलण्यात आली? तुम्हाला माहिती आहे का कारण? )

ट्रम्प यांनी हाऊस ऑफ रिपब्लिकन्समध्ये सांगितलं होतं की, 'आपण आता असं होऊ देणार नाही. आपण नेहमी अमेरिकेला प्राधान्य देऊ. आपलं नुकसान करणाऱ्या देशांवर आम्ही टॅरीफ लावणा आहोत. चीन जबरदस्त टॅरीफ मेकर आहे. भारत, ब्राझीलसह अन्य देशही यामध्ये सहभागी आहेत. पण, आम्ही असं होऊ देणार नाही. कारण, आपण अमेरिकेला सर्वात पहिल्यांदा ठेवणार आहोत. '

ट्रम्प यांनी मंगळवारी आपल्या समर्थकांना सांगितले की, आम्ही एकत्र व्यवसाय करणार आहोत. ' कोणी आमच्याकडून 10 सेंट (ड्युटी म्हणून) घेतं.. जर त्यांनी आमच्याकडून 2 डॉलर्स घेतले, त्यांनी आमच्याकडून 100% किंवा 250% घेतले तर... आम्ही त्यांच्यावर समान शुल्क आकारू.'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, 'हे लोक (भारतीय, चिनी आणि ब्राझिलियन लोकांचा संदर्भ देत) सर्वात कठोर आहेत... ते आपल्याविरुद्ध वापरतात. भारत, ब्राझील खूप कठो आहे. चीन सर्वात कठोर आहे.आम्ही टॅरिफसह चीनची काळजी घेत आहोत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com