मानवजातीचे भविष्य बदलण्याची ताकद असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञानाचा विकास ज्या वेगाने सुरू आहे, तो पाहता आता हे तंत्रज्ञान बनवणारेच भयभीत झाले आहेत. जगभरातील 11 हजारहून अधिक एआय तज्ज्ञ, संशोधक आणि कंपन्यांच्या प्रमुखांनी मंगळवारी (28 जुलै) अमेरिकन सरकारला एक याचिका सादर करत एआयच्या विकासाची आणि लाँचिंगची गती कमी करण्याची मागणी केली आहे.
'पेसिंग द फ्रंटियर' याचिका काय आहे?
या याचिकेवर अँथ्रोपिक (Anthropic) कंपनीचे सीईओ डारियो अमोडेई (Dario Amodei), OpenAI चे रिसर्च हेड, गूगल डीपमाइंडचे रणनीतिक प्रमुख आणि मेटा एआयच्या मुख्य शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
जगासाठी कडक नियमांची मागणी
एआय मॉडेल्स ज्या वेगाने तयार होत आहेत, त्यांना कडक चौकटीत आणण्यासाठी जागतिक नियम आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन याचिकेत करण्यात आले आहे. तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली आहे की, कंपन्या लवकरच अशा टप्प्यावर पोहोचतील जिथे एआय स्वतः दुसऱ्या एआयवर संशोधन सुरू करेल. यामुळे त्याचा वेग इतका प्रचंड वाढेल की, मानवी बुद्धीला तो समजणे किंवा नियंत्रित करणे अशक्य होईल.
(नक्की वाचा- IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा)
OpenAI चे मॉडेल्स झाले नियंत्रणाबाहेर
एआय नियंत्रणाबाहेर जाण्याचे एक धक्कादायक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. ChatGPT ची मूळ कंपनी असलेल्या OpenAI च्या दोन एआय मॉडेल्सने चाचणीदरम्यान स्वतःच्या सुरक्षेसाठी लावलेल्या सर्व मर्यादा ओलांडल्या. हे एआय मॉडेल्स इंटरनेटशी स्वतःहून कनेक्ट झाले आणि त्यांनी 'हगिंग फेस' (Hugging Face)या कोडिंग वेबसाईटवर परस्पर सायबर हल्ला केला. या गंभीर घटनेनंतर OpenAI ने आपल्या नवीन एआय मॉडेल्सची चाचणी काही काळासाठी थांबवून सिस्टीमची 'सँडबॉक्सिंग' सुरक्षा अधिक मजबूत केली.
(नक्की वाचा- लोक हसले, पण गडी खचला नाही; 4 आंबे साडेतीन लाखांना विकून दाखवले, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याची देशभर चर्चा)
"आम्ही सिंगुलॅरिटीच्या टप्प्यात पोहोचलो आहोत" - सॅम ऑल्टमॅन
OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमॅन (Sam Altman) यांनी या याचिकेवर थेट स्वाक्षरी केली नसली तरी, एका मुलाखतीत त्यांनी तंत्रज्ञानाचा वेग कमी करण्याच्या विचाराला पाठिंबा दिला आहे. सॅम ऑल्टमॅन म्हणाले की, "समाजाला एआयच्या या नव्या आणि प्रचंड शक्तीशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी सर्व एआय कंपन्यांना एकत्र येऊन एआयच्या विकासाचा वेग स्वेच्छेने कमी करावा लागेल. आपण आता 'सिंगुलॅरिटी'च्या टप्प्यात प्रवेश केला आहे.ही अशी काल्पनिक स्थिती आहे जिथे तंत्रज्ञानाची बुद्धिमत्ता मानवी बुद्धी आणि नियंत्रणाच्या पार जाते."
अमेरिकन सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देऊन एंथ्रोपिक आणि OpenAI च्या काही शक्तिशाली मॉडेल्सच्या लाँचिंगवर तात्पुरती बंदी घातली होती. आता पुन्हा एकदा या तंत्रज्ञानावर जागतिक स्तरावर मर्यादा आणण्याची मागणी तीव्र झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world