जाहिरात

Nifty Sensex Today : सेन्सेक्स आणि निफ्टीची ऐतिहासिक उसळी, रुपया देखील वधारला

Share market News: भारतीय शेअर बाजाराने आज 'प्रि-ओपनिंग' सत्रातच 5 टक्क्यांची मोठी झेप घेतली, तर भारतीय रुपयानेही डॉलरच्या तुलनेत 1.2% ची वाढ नोंदवत 90.40 चा स्तर गाठला.

Nifty Sensex Today : सेन्सेक्स आणि निफ्टीची ऐतिहासिक उसळी, रुपया देखील वधारला

Share Market News: भारत आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक व्यापार करारामुळे भारतीय शेअर बाजारात आणि रुपयाच्या मूल्यात 3 फेब्रुवारी रोजी मोठी तेजी पाहायला मिळत आहे.

आज बाजार उघडताचा सेन्सेक्स 85,323.20 अंकांवर पोहोचला. म्हणजेच 3,656.74 अंकांनी किंवा 4.48% नी वाढला. निफ्टी 50 देखील  26,308.05 अंकांवर उघडला म्हणजेच 1,219.65 अंकांनी किंवा 4.86% नी वाढला.

तर भारतीय शेअर बाजाराने आज 'प्रि-ओपनिंग' सत्रातच 5 टक्क्यांची मोठी झेप घेतली, तर भारतीय रुपयानेही डॉलरच्या तुलनेत 1.2% ची वाढ नोंदवत 90.40 चा स्तर गाठला.

टॅरिफ  25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेनंतर या करारावर शिक्कामोर्तब झाले असून, यामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांना बळकटी मिळाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेनंतर अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेला 25 टक्के टॅरीफ 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेचे स्वागत करताना पंतप्रधान मोदींनी 'एक्स'वर (ट्विटर) आपल्या भावना व्यक्त केल्या. "माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी आज संवाद साधला. 'मेड इन इंडिया' उत्पादनांवरील शुल्क 18 टक्क्यांपर्यंत खाली येणार असल्याचे जाणून खूप आनंद झाला. भारतीय जनतेच्या वतीने मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानतो," असे मोदींनी म्हटले आहे. जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी ट्रम्प यांचे नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कराराच्या बदल्यात भारतानेही अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत अमेरिकेकडून ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी, कोळसा आणि इतर उत्पादनांची सुमारे 500 अब्ज डॉलरहून अधिक किंमतीची खरेदी करणार आहे. तसेच, भारत अमेरिकेच्या वस्तूंवर असलेल्या व्यापारी आणि निम-व्यापारी अडथळ्यांना (Non-tariff barriers) शून्य करण्याच्या दिशेने पावले उचलेल असे सांगण्यात आले आहे.

भारत आणि अमेरिकेमध्ये झालेल्या संवादात रशिया-युक्रेन युद्धासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. ट्रम्प यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदी रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद करण्यास आणि त्याऐवजी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करण्यास तयार झाले आहेत. संभाव्यतः वेनेझुएलाकडूनही तेल खरेदी करण्यावर सहमती झाली आहे. रशियाची आर्थिक ताकद कमी करून युक्रेनमधील युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल मानले जात आहे. मात्र भारताकडून याबाबत अधिकृत स्वरुपात माहिती अद्याप मिळालेली नाही. 

इतर देशांच्या तुलनेत भारताला फायदा

अमेरिकेने इतर देशांवर लावलेल्या शुल्काच्या तुलनेत आता भारताची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. सध्या अमेरिका इंडोनेशियावर 19%, व्हिएतनाम आणि बांगलादेशवर 20%, तर चीनवर 34% शुल्क आकारत आहे. भारतासाठी हे शुल्क 18% झाल्यामुळे भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेत मोठी स्पर्धात्मक संधी मिळणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com