जाहिरात

VIDEO : रेसिप्रोकल टॅरिफचा भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होईल?

Share market News : भविष्यातील चांगल्या परताव्याच्या दृष्टीने व्हॅल्व्यू स्टॉक्सना सपोर्ट करून मार्केटमध्ये गुंतवणूक दिसत आहे. शेअर बाजारात गेल्या पाच महिन्यात मोठी घसरण पाहण्यात आली. मात्र आता मार्केट सावरत आहे.

VIDEO : रेसिप्रोकल टॅरिफचा भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होईल?

Tariff Effect on Share Market : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे जशास तसे आयातशुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प सरकारने भारतावर 26 टक्के आयात शुल्क लावले आहे. याचा परिणाम शेअर बाजारावरही झाल्याचं दिसून येत आहे.

कोटक सिक्युरिटीजचे हेड ऑफ रीसर्च श्रीकांत चौहान यांनी म्हटलं की,  भारतीय शेअर बाजारात अमेरिकेच्या रेसिप्रोकल टेरिफ इव्हेंटच्या आधीच बरंच करेक्शन झालं आहे. ट्रम्प टॅरिफबाबतची जी भीती आहे, ती गुंतवणूकदारांमध्ये कमी झाली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला शेअर बाजारात गुंतवणुकीच्या संधी आहेत.

(नक्की वाचा - Property Tax : मुंबईकरांवर कराचा भार वाढणार? मालमत्ता कर 13 टक्क्यांपर्यंत वाढीचा प्रस्ताव)

 शेअर बाजारावर काय परिणाम होईल? पाहा सविस्तर VIDEO

भविष्यातील चांगल्या परताव्याच्या दृष्टीने व्हॅल्व्यू स्टॉक्सना सपोर्ट करून मार्केटमध्ये गुंतवणूक दिसत आहे. शेअर बाजारात गेल्या पाच महिन्यात मोठी घसरण दिसली. मात्र आता मार्केट सावरत आहे. रुपयात देखील मोठी घसरण झाली होती, मात्र त्यातही सुधारणा झाली आहे. त्यामुळे सध्या बाजारात गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे, असं देखील श्रीकांत चौहान यांनी म्हटलं.  

अमेरिकेकडून जो टॅरिफ भारतावर लादला जाणार आहे, त्यात फार्मा सेक्टरचा मोठा वाटा असेल. मात्र फार्मा सेक्टरचा अभ्यास केला तर दिसून येत आहे की फार्मा सेक्टरवर मोठ्या प्रमाणात शुल्क लावणे अमेरिकेलाही कठीण आहे. फार्माचे निवडक स्टॉक्स नक्कीच चांगला परताना देतील. त्यामुळे फार्मा सेक्टरवर फोकस करायचा असेल तर निवडक स्टॉक्सवर फोकस केला पाहिजे, असा सल्ला देखील श्रीकांत चौहान यांनी दिला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: