Organ donation : केरळमध्ये नुकतच असं एक दृश्य पाहायला मिळालं ज्यामुळे प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. अवघ्या १० महिन्यांच्या लहानगी आलिन शेरिन अब्राहम आता या जगात नाही, मात्र तिचं नाव कायम आशा आणि माणुसकीचं प्रतिक म्हणून घेतलं जाईल. जेव्हा एखादं कुटुंब आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दु:खादरम्यान एखाद्याला नवजीवन देण्याचा निर्णय घेते त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
एक अपघात आणि साहसी निर्णय...
५ फेब्रुवारीला पथानमथिट्टा जिल्ह्याजवळ एका रस्ते अपघाताता आलिन गंभीर जखमी झाली होती. ती आई-बाबा आणि आजी-आजोबांसोबत प्रवास करीत होती. तेव्हाच समोरुन येणाऱ्या कारने धडक दिली. यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी प्रयत्न केले, मात्र १२ फेब्रुवारी रोजी तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. या दु:खादरम्यान तिच्या आई-वडिलांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी दहा महिन्यांच्या लहानगीचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.
पाच मुलांना मिळालं नवजीवन...
आलिनच्या आई-वडिलांनी तिचं लिव्हर, किडनी, हॉर्ट वॉल्व आणि कॉर्निया दान करण्याचा निर्णय घेतला. या अवयवांचं यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आलं आणि पाच गंभीर मुलांना नवजीवन मिळालं.
- आलिनचं लिव्हर एका ६ महिन्याच्या बाळाला देण्यात आलं.
- किडनी एका दहा वर्षांच्या मुलाला दिली
- हार्ट वॉल्व आणि कॉर्नियादेखील वेगवेगळ्या रुग्णालयातील गरजूंपर्यंत पोहोचविण्यात आला.
ग्रीन कॉरिडोरची उभारणी...
अवयव सुरक्षितपणे आणि वेळेच पोहोचवणं अत्यंत आवश्यक होतं. हेलिकॉप्टर उपलब्ध न झाल्यामुळे सरकार आणि पोलिसांनी विशेष ग्रीन कॉरिडोरची आखणी केली. कोच्ची ते तिरुवनंतरपुरमपर्यंत साधारण २३० किलोमीटर अंतर अवघे ३ तास २० मिनिटात पूर्ण करण्यात आलं. यासाठी ट्रॅफिक कंट्रोल आणि मॅन्यूअल सिग्नलिंगची व्यवस्था करण्यात आली. प्रशासन, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस यांच्या एकत्रित मेहनतीमुळे हे शक्य झालं.
अवयवदान इतकं महत्त्वाचं का असतं?
भारतात दरवर्षी हजारो रुग्ण अवयव प्रत्यारोपणाची वाट पाहत असतात. मात्र अवयवदान करणाऱ्यांच्या कमतरतेमुळे अनेकांना वेळेवर अवयव मिळू शकत नाहीत.
- अवयवदानामुळे अनेकांचे जीव वाचवू शकतात.
- ब्रेन डेडनंतर हे शक्य आहे.
- एक दाता आठ लोकांना मदत करू शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world