
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान बिथरला आहे. भारताने केलेल्या हल्ल्यानंतर ही पाकिस्तान कुरापती काढतच आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून कालपासून जम्मू काश्मीरच्या सीमा भागात तुफान गोळीबार केला जाता आहे. त्यात ते स्थानिक नागरिकांना लक्ष्य करत आहेत. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहिती नुसार पाकिस्तान सैन्याने काल रात्रीपासून केलेल्या गोळीबारात 15 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 43 जखमी झाले आहेत. या गोळीबाराचा फटका जम्मू काश्मीरच्या पूंछ आणि तंगधारमधील नागरी वस्त्यांना बसला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तान सैन्याने जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागातील नागरी वस्त्यांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तान कडून होणाऱ्या गोळीबारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गोळीबारात सीमा भागातल्या लोकांच्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान ही झाले आहे. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर, पाकिस्तान सैन्याने बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातील नागरी वस्त्यांना लक्ष्य करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
ट्रेंडिंग बातमी - भारताच्या Operation Sindoor नंतर पाकिस्तानात काय चाललंय? 'या' 10 गोष्टी आल्या समोर
या गोळीबारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अनेक घरांचे नुकसान झाले. पाकिस्तानच्या गोळीबारात नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांचे आणि सरकारी कार्यालयांचे यात नुकसान झाले आहे. घराच्या भिंतीना तडे गेले आहेत. खिडक्या फुटल्या आहेत. असे सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही सीमावर्ती भागातील सध्याच्या परिस्थितीवर अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक घेतली आहे.
ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?
पाकिस्तानच्या गोळीबाराचा फटका गुरुद्वारा श्री गुरु सिंहला बसला. त्यात दरवाजांचे नुकसान झाले आहे. काही काचा फुटल्या आहेत असे जिल्हा गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष नरिंदर सिंह यांनी सांगितले. तर जम्मू आणि काश्मीरच्या सीमा भागात राहाणाऱ्या गावकऱ्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सांगितले की, भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये शौर्य आणि पराक्रम दाखवून एक नवा इतिहास रचला आहे. सैन्याला पूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world