राजस्थानच्या बिकानेरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 17 वर्षीय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडूचा सरावादरम्यान मृत्यू झाला आहे. पॉवरलिफ्टिंग खेळाडू आणि सुवर्णपदक विजेती यश्तिका आचार्य जीममध्ये सराव करताना अपघात घडला. 270 किलो वजनाचा रॉड तिच्या अंगावर पडल्याने तिची मान मोडली. घटनेनंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिचा डॉक्टरांनी मृत घोषित केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बीकानेरच्या आचार्य चौक परिसरात राहणाऱ्या ऐश्वर्या आचार्य यांची मुलगी यश्तिका पॉवरलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होती. मंगळवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास, यश्तिका नेहमीप्रमाणे बडा गणेश जी मंदिराजवळील एका खाजगी जीममध्ये सराव करत होती. या दरम्यान, प्रशिक्षकाच्या उपस्थितीत, तिने 270 किलो वजनाचा स्क्वॉट करण्याचा प्रयत्न केला.
(वाचा- Best bus fare hike : बेस्ट बसच्या दरात दुप्पट वाढ? सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार)
यादरम्यान यश्तिकाचा तोल गेला आणि तिच्या हातातून रॉड निसटला. मात्र 270 वजनाचा तो रॉड तिच्या मानेवर पडला. प्रशिक्षक आणि जवळ उपस्थित असलेल्या इतर खेळाडूंनी तिच्या हातातून रॉड काढला. पण तोपर्यंत यश्तिका बेशुद्ध झाली होती. काही सेकंदात ही सर्व घटना घडली.
प्रशिक्षकाने सीपीआर देऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु यष्टिका आचार्य शुद्धीवर आली नाही. त्यानंतर लगेचच तिला पीबीएम रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी यश्तिकाला मृत घोषित केले.