जाहिरात

Newborn Dies: आई-वडिलांच्या कुशीत झोपलेल्या 23 दिवसांच्या बाळाचा झोपेतच मृत्यू; परिसरात हळहळ

आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे सांगितले आहे. या जोडप्याचे हे लग्नानंतरचे पहिले बाळ होते, ज्यामुळे घरात काही आठवड्यांपूर्वी आलेले आनंदाचे वातावरण आता शोकात बदलले.

Newborn Dies: आई-वडिलांच्या कुशीत झोपलेल्या 23 दिवसांच्या बाळाचा झोपेतच मृत्यू; परिसरात हळहळ
Doctors at the health centre said the newborn died due to suffocation. (Representational)

Uttar Pradesh News: अमरोहा जिल्ह्यातील गजरौला येथील एका कुटुंबावर रविवारी रात्री दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नानंतर चार वर्षांनी जन्मलेल्या त्यांच्या केवळ 23 दिवसांच्या नवजात बाळाचा रात्री झोपेत असताना अपघाताने गुदमरून मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले?*

मिळालेल्या माहितीनुसार, बाळाला आई-वडिलांनी आपल्यामध्ये झोपवले होते. रात्री झोपेत असताना नकळतपणे पालटलेली कूस बाळावर पडली.ज्यामुळे बाळाला श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला आणि त्याचा गुदमरून मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे 8 वाजता आईला जाग आली, तेव्हा तिला कळले की बाळ कोणतीही हालचाल करत नाही.

(नक्की वाचा-  साईबाबा आणि बालाजी भक्तांसाठी खूशखबर! शिर्डी-तिरुपती एक्सप्रेस सुरु, राज्यात 11 ठिकाणी थांबणार गाडी)

जोडप्याने त्वरीत बाळाला घेऊन स्थानिक रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. मृत नवजात बाळाचे नाव सुफियान होते. सद्दाम अब्बासी आणि त्यांची पत्नी अस्मा यांचा तो एकुलता एक मुलगा होता.

रविवारी सकाळी अस्मा बाळाला दूध पाजण्यासाठी उठली, तेव्हा तिला बाळ कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे आढळले. यावर सद्दाम यांनी तातडीने बाळाला घेऊन जवळील रुग्णालय गाठले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर बाळाला मृत घोषित केले. रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आई-वडील एकमेकांना जबाबदार धरत वाद घालत होते. ज्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना परिस्थिती शांत करण्यासाठी प्रयत्न करावे लागले.

(नक्की वाचा-  Dombivli News: कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! कोळेगावमध्ये 21 डिसेंबरपर्यंत वाहतूक मार्गात बदल)

नातेवाईकांनी सांगितले की, बाळ जन्मापासूनच अशक्त होते आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच, त्याला नंतर काविळ देखील झाली होती. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे सांगितले आहे. या जोडप्याचे हे लग्नानंतरचे पहिले बाळ होते, ज्यामुळे घरात काही आठवड्यांपूर्वी आलेले आनंदाचे वातावरण आता शोकात बदलले.

बालरोग तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

या दुर्दैवी घटनेनंतर बालरोग तज्ज्ञ डॉ. अमित वर्मा यांनी पालकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की, नवजात बाळांना नेहमी वेगळे झोपवावे. प्रौढांसोबत बेड शेअर केल्यास अपघाती गुदमरण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com