जाहिरात

Operation sindoor: भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीतील हे आहेत 7 योद्धे, ज्यांनी पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली

एस 400. सैन्याने याला सुदर्शन नाव दिले आहे. पंजाबमध्ये पाकिस्तानचे हल्ले परतवून लावण्यात सुदर्शनने कमालीची ताकद दाखवली.

Operation sindoor: भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीतील हे आहेत 7 योद्धे, ज्यांनी पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली

गुरुवारी रात्री जम्मूमध्ये पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले थोपवण्यात भारताच्या आकाश मिसाइल सिस्टीमची (India's Air Defence System) खूप चर्चा झाली. आकाशने असे काही करून दाखवले आहे की पाकिस्तान अजूनही डोळे वर करून पाहू शकत नाही. भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने एका सुरक्षा छत्रीप्रमाणे काम केले. जम्मूमध्ये जवळपास 50 पाकिस्तानी ड्रोन भंगार झाले . जेएफ-17 आणि एफ-16 सारखी फायटर प्लेन, ज्यावर पाकिस्तानला गर्व होता, ती याच सिस्टीमच्या आधारे पाडली गेली. एनडीटीव्हीशी बोलताना संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल एसवीपी सिंह यांनी सविस्तरपणे सांगितले की, काल रात्री भारताच्या या हवाई सुरक्षा प्रणालीने कसे काम केले. यात पहिले शस्त्र आकाश होते. जे डीआरडीओने बनवले आहे. आकाशने पाकिस्तानला चीनकडून मिळालेले जेएफ-17 हे विमान जमीनदोस्त केले. आकाश मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली (SAM) आहे. ही इतकी प्रभावी आहे की अनेक देश ती मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. एसवीपी सिंह यांनी सांगितले की, ही एक उच्च दर्जाची शस्त्र प्रणाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

1 बराक मिसाइल सिस्टीम
बराक-8 हे नावच पुरेसे आहे. हे क्षेपणास्त्र अशा प्रकारे डिझाइन केले आहे की, वेगाने येणाऱ्या आणि रडारला चकवा देणाऱ्या शत्रूच्या क्षेपणास्त्रांना ते हेरते. ऐवढेच नाही तर ते त्यांना खाली ही पाडते. बराक क्षेपणास्त्र भारताने इजरायलच्या सहकार्याने विकसित केले आहे.

2 स्पायडर मिसाइल सिस्टीम
स्पायडर हे इजरायली क्षेपणास्त्र आहे. हे जमीनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ज्यामुळे शत्रूची दाणादाण उडते. हे क्षेपणास्त्र मानवरहित विमान, हेलिकॉप्टर आणि ड्रोनसह अचूक लक्ष्य साधणाऱ्या युद्धसामग्रीलाही सहजपणे लक्ष्य करू शकते.

3 पेचोरा मिसाइल
पेचोरा क्षेपणास्त्र भारतीय हवाई सुरक्षा प्रणालीचा महत्त्वाचा भाग आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम आहे. त्याचे 12 प्रकार जगभरातील 30 हून अधिक देशांमध्ये वापरले जातात. यात लावलेल्या क्षेपणास्त्राचे वजन 953 किलो आहे. भारताकडे या क्षेपणास्त्रांचे 30 स्क्वॉड्रन आहेत. सुरक्षेसाठी ते वेगवेगळ्या सीमांवर तैनात केले आहेत.

4 एल-70 अँटी एअरक्राफ्ट गन
एल-70 ही स्वीडनमध्ये बनलेली अँटी एअरक्राफ्ट गन आहे. जुन्या तंत्रज्ञानाच्या या हवाई सुरक्षा प्रणालीला भारताने बीईएलच्या मदतीने अपग्रेड केले आहे. ही एअरक्राफ्ट गन सुमारे 3-4 किलोमीटरच्या अंतरावर आपले लक्ष्य नष्ट करण्याची क्षमता ठेवते. या हवाई सुरक्षा प्रणालीचा वापर कमी उंचीवर उडणारे ड्रोन आणि हलकी लढाऊ विमाने पाडण्यासाठी केला जातो. यात ऑटोमॅटिक फायरिंग सिस्टीम बसवलेली आहे, ती थेट रडारच्या माध्यमातून लक्ष्याचा भेद घेते. 

5 झेडयू- 23 ट्विन बॅरल
झेडयू-23 ही रशियामध्ये बनलेली ट्विन बॅरल असलेली 23 मिमीची एक अँटी एअरक्राफ्ट गन आहे. जी पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीसाठी भारतीय सैन्य आणि हवाई दल याचा सर्वाधिक वापर करते. झेडयू- 23 ची मारक क्षमता 2.5 किलोमीटरपर्यंत आहे. ही एअरक्राफ्ट गन ऑप्टिकल साइट आणि रडार आधारित ट्रॅकिंग सिस्टीमने सुसज्ज आहे. या हवाई सुरक्षा प्रणालीने उधमपूर आणि इतर अनेक ठिकाणी कमी उंचीवर उडणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनला हवेतच नष्ट केले होते.

6 एसयू-23 फायटर जेट
एसयू-23 हे एक मल्टीरोल फायटर जेट आहे. ते हवेतील आणि जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने बनवले आहे. रशियामध्ये बनवलेली ही हवाई सुरक्षा प्रणाली 1960 आणि 1970 च्या दशकात विकसित केली गेली. हे भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीचा महत्त्वाचा भाग आहे. ही प्रणाली शत्रूला धूळ चारण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे.

7 तुंगुस्का मिसाइल
तुंगुस्का हे एक रशियन क्षेपणास्त्र आहे. कंटेनरयुक्त आणि कमी अंतराचे कमांड-गाइडेंस मिसाइल जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता ठेवते. हे शत्रूला हवेतच मारण्यास सक्षम आहे.

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?

संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल एसवीपी सिंह यांनी सांगितले की, भारताची हवाई सुरक्षा प्रणाली इतकी मजबूत आहे की पाकिस्तानच्या हवाई दलाची विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन भारताच्या सीमेत प्रवेशही करू शकले नाहीत. भारताच्या सुरक्षा प्रणालीत समाविष्ट असलेल्या दुसऱ्या ज्या शस्त्राची सर्वाधिक चर्चा होत आहे, ते म्हणजे एस 400. सैन्याने याला सुदर्शन नाव दिले आहे. पंजाबमध्ये पाकिस्तानचे हल्ले परतवून लावण्यात सुदर्शनने कमालीची ताकद दाखवली. हे 90 किलोमीटरपर्यंत मारा करते.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com