जाहिरात

Plane landing gear : विमानाच्या चाकामध्ये लपून काबुलहून दिल्लीला पोहोचला, सर्वजण हैराण, जिवंत कसा वाचला?

तपासादरम्यान विनानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांना लँडिंग गिअरजवळ एक छोटा लाल रंगाचा स्पीकरही मिळाला आहे. या भयंकर घटनेनंतर मुलाला तातडीने एजन्सीकडे चौकशीसाठी पाठविण्यात आलं आहे.

Plane landing gear : विमानाच्या चाकामध्ये लपून काबुलहून दिल्लीला पोहोचला, सर्वजण हैराण, जिवंत कसा वाचला?

Hiding in landing gear of flight : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. काबुलहून दिल्लीला आलेल्या एका विमानाच्या लँडिंग गिअर म्हणजेच चाकामध्ये 13 वर्षांचा मुलगा लपून भारतात पोहोचला आहे. ही घटना 21 सप्टेंबरला सकाळी 11.10 वाजता समोर आली. केएएम विमान सेवेचे (KAM Airlines) फ्लाइट (RQ-4401) दिल्ली एअरपोर्टवर लँड झालं. त्यावेळी विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना विमानाजवळ एक लहान मुलगा दिसला. चौकशी केल्यानंतर तो अफगणिस्तानच्या कुंदुज शहरातील राहणारा असल्याचं समोर आलं आणि तिकीट नसल्यामुळे तो विमानाच्या चाकाजवळील भागात लपून आला होता. 

तपासादरम्यान विनानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांना लँडिंग गिअरजवळ एक छोटा लाल रंगाचा स्पीकरही मिळाला आहे. या भयंकर घटनेनंतर मुलाला तातडीने एजन्सीकडे चौकशीसाठी पाठविण्यात आलं आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याच दिवशी दुपारी त्याला केएएम विमानाने काबुलल पाठविण्यात आलं आहे.

94 मिनिटं जीवन आणि मृत्यूशी संघर्ष 

एका वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, केएएम एअरच्या विमान RQ4401 ने काबुल ते दिल्लीपर्यंत प्रवास 94 मिनिटात पूर्ण केला. यादरम्यान एक अफगानी मुलगा विमानाच्या मागील चाकाच्या वरच्या बाजूला असलेल्या जागेत लपून बसला होता. भारतीय वेळेनुसार, या विमानाने सकाळी 8:46 वाजता काबुलहून उड्डाण केलं आणि 10.20 मिनिटांनी दिल्लीच्या टर्मिनल-२ वर लँड केलं. 
 

Latest and Breaking News on NDTV

चाकापर्यंत कसा पोहोचला? 

मुलाने सांगितलं की, काबुल विमानतळावर तो प्रवाशांच्या मागे मागे रनवेपर्यंत पोहोचला. कोणी पाहत नाही हे लक्षात घेत तो विमानात चढला आणि उड्डाण होण्याच्या काही वेळापूर्वी चाकाजवळील जागेत लपला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा अल्पवयीन आहे. त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. 

विमानाच्या चाकातून प्रवास म्हणजे जीवाशी खेळ...

विमानाच्या चाकात बसून प्रवास करणं अशक्य असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. विमान उड्डाण करतान ऑक्सिजन कमी होऊ लागतं आणि तापमान शून्यापेक्षा खाली जाते. पहिली महत्त्वाची बाब म्हणजे विमानाने उड्डाण केल्यानंतर चाकं आत जातात. त्यातच कोणाचाही जीव जाऊ शकतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकं आत ओढल्यानंतर ती जागा पूर्णपणे बंद होते. त्यावेळी एखाद्या कोपऱ्यात प्रवासी काही काळासाठी जिवंत राहू शकतो. मात्र ३० हजार फूट उंचावर श्वास घेणं आणि जीवंत राहणं असंभव आहे. 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com