जाहिरात

अदाणी पोर्ट्सद्वारे संचालित मुंद्रा बंदराचा विक्रम, भारतात आलेल्या सर्वाधिक क्षमतेच्या जहाजाने टाकला नांगर

अंदाजे चार फुटबॉल फील्ड यात मावतील. 20 फुटांचे तब्बल 19,200 कंटेनर वाहून नेण्याची क्षमता या जहाजाची आहे. भारतातील मुक्कामादरम्यान 12,500 कंटेनर्सची देवाण घेवाण या जहाजवरून होणे अपेक्षित आहे. 

अदाणी पोर्ट्सद्वारे संचालित मुंद्रा बंदराचा विक्रम, भारतात आलेल्या सर्वाधिक क्षमतेच्या जहाजाने टाकला नांगर

देशातील सर्वात मोठं मुंद्रा बंदर अर्थात अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लि. (APSEZ) आणि लॉजिस्टिक कंपनीने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. सर्वात मोठं मालवाहू जहाज मुंद्रा बंदरात दाखल झालं आहे.  MSC Anna हे जहाज 25 मे रोजी बंदर आणि देशाच्या सागरी उद्योगासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

अवाढव्य असं MSC Anna जहाज तब्बल 399.98 मीटर लांबीचं आहे. हे इतकं मोठे आहे की अंदाजे चार फुटबॉल फील्ड यात मावतील. 20 फुटांचे तब्बल 19,200 कंटेनर वाहून नेण्याची क्षमता या जहाजाची आहे. भारतातील मुक्कामादरम्यान 12,500 कंटेनर्सची देवाण घेवाण या जहाजवरून होणे अपेक्षित आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

MV MSC हॅमबर्ग

जगातील सर्वात मोठ्या मालवाहू जहाजांपैकी एक असलेले MV MSC हॅमबर्ग हे जहाज जुलै 2023 मध्ये अदाणी पोर्ट्समध्ये दाखल झालं होतं. या जहाजाची लांबी 399 मीटर आणि 16,652 कंटेनर्स वाहून क्षमता आहे. त्याचवेळा अदाणी पोर्ट्सने जगातील सर्वात मोठी जहाजे हाताळण्याची आपली क्षमता दाखवून दिली होती. आता MSC Anna जहाजाच्या दाखल झाल्याने अदाणी पोर्ट्सने आपली क्षमता आणखी वृद्धिंगत केली आहे.

Adani Ports MSC anna

Adani Ports MSC anna

(नक्की वाचा- अदाणी ग्रुपमधील गुंतवणुकीमुळे GQG पार्टनर्स मालामाल, 4.3 बिलियन डॉलरची गुंतवणूक 11.48 बिलियन डॉलरवर)

अदाणी पोर्ट्चे 2023 मधील कामगिरी

जून 2023 नंतर अदाणी पोर्ट्स अनेक विक्रम आपल्या नावे केले. ऑक्टोबरमध्ये, एकाच महिन्यात 16 MMT कार्गो जहाज हाताळणारे ते भारतातील पहिले बंदर ठरले. त्यानंतर कंटेनर टर्मिनल CT-3 ने एका वर्षात 30 लाख कंटेनर्सचे मॅनेजमेंट करुन एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. नोव्हेंबरमध्ये याच टर्मिनलने एका महिन्यात 3 लाखांहून अधिक कंटेनर्स हाताळण्याचा विक्रम देखील केला, जो भारतातील कोणत्याही टर्मिनलद्वारे एका महिन्यातील सर्वाधिक आहे.

(नक्की वाचा - तुमचा मुलगा 25 व्या वर्षी होईल कोट्यधीश, 'या' पद्धतीनं करा बचतीला सुरुवात)

अदाणी पोर्ट्सची क्षमता 

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येणे हे अदाणी पोर्ट्सच्या धोरणात्मक नियोजन आणि जागतिक दर्जाच्या सुविधांचा पुरावा आहे. 35,000 एकरावर पसरलेले, हे भारतातील सर्वात मोठे व्यावसायिक बंदर आहे. MSC Anna चे अदाणी पोर्ट्स येथे आगमन केवळ मोठी मालवाहू जहाजे हाताळण्याची बंदराची क्षमताच दाखवत नाही, तर भारताच्या सागरी व्यापार क्षमता वाढवण्यातील महत्त्वपूर्ण भूमिका देखील दाखवते. येत्या काळात देखील हे बंदर आंतराष्ट्रीय जहाज वाहतूक आणि दळणवळणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
वंदे मेट्रो ट्रेनचं नाव बदललं, भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
अदाणी पोर्ट्सद्वारे संचालित मुंद्रा बंदराचा विक्रम, भारतात आलेल्या सर्वाधिक क्षमतेच्या जहाजाने टाकला नांगर
Palestinian-prisoners-physically tortured-assaulted by-israeli-women-soldiers-victim-told-after-video-leaks-of-detention-center
Next Article
इस्रायली महिला सैनिकांनी लैंगिक अत्याचार केले, रोज रक्तस्त्राव व्हायचा; पॅलेस्टाईनच्या कैद्याचे गंभीर आरोप