जाहिरात

Logistics Park : अदाणी समूहाकडून कोचीमधील 600 कोटींच्या लॉजिस्टिक्स पार्कचं भूमिपूजन

अदाणी समूहाने शनिवारी केरळमधील कोची येथील पहिल्या लॉजिस्टिक्स पार्कची पायाभरणी केली.

Logistics Park : अदाणी समूहाकडून कोचीमधील 600 कोटींच्या लॉजिस्टिक्स पार्कचं भूमिपूजन

Adani Group : अदाणी समूहाने शनिवारी केरळमधील कोची येथील पहिल्या लॉजिस्टिक्स पार्कची पायाभरणी केली. अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वनी गुप्ता यांनी याला राज्याच्या औद्योगिक प्रवासातील ऐतिहासिक मैलाचा दगड असं म्हटलं आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 

दाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वनी गुप्ता यावेळी म्हणाले, अदाणी लॉजिस्टिक पार्क हा 70 एकरमध्ये (1.3 दशलक्ष चौरस फूट) पसरलेला असेल. यासाठी 600 कोटींहून अधिक गुंतवणूक करण्यात येईल. या लॉजिस्टिक्स पार्कमधून 1500 नोकऱ्या निर्माण होतील. याशिवाय स्थानिक लघू आणि मध्यम उद्योगांनाही यामुळे मोठी मदत मिळेल.   

'भारतासारख्या सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा, जगात कुठेही नाहीत!' गौतम अदाणींनी सांगितलं कारण

नक्की वाचा - 'भारतासारख्या सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा, जगात कुठेही नाहीत!' गौतम अदाणींनी सांगितलं कारण

हे लॉजिस्टिक पार्क अख्ख्या जगासाठी खुलं असेल. यामुळे केरळ व्यापारीदृष्ट्या अधिक प्रभावी ठरेल असंही गुप्ता म्हणाले. यावेळी त्यांनी, लॉजिस्टिक पार्कचं तंत्रज्ञान, प्रतिभा, गोदामावर लक्ष केंद्रीत केलेलं डिझाइन अधोरेखित केलं. हा प्रकल्प Invest in Kerala या कार्यक्रमाअंतर्गत विकसित केला जात आहे. गुंतवणुकदारांना अनुकून वातावरण निर्माण करून दिल्याबद्दल गुप्ता यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रानी एकमेकांना सहकार्य केल्याने सकारात्मक  परिवर्तन होत आहे.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com