नवे वर्ष सुरु व्हायला अवघे काही तास उरलेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झालेत. नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत असून मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच मुस्लीम समुदायाने नवीन वर्ष साजरे करु नये, ते इस्लामविरोधात आहे, असा अजब फतवा ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी जारी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑल इंडिया मुस्लिम जमात (एआयएमजे) चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन बरेली यांनी हे इस्लामिक नववर्ष नसून ख्रिश्चन नववर्ष आहे. त्यामुळे तरुणांनी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. मुस्लिम तरुण मुले आणि मुली नवीन वर्षाचे औचित्य साधतात आणि हॉटेलमध्ये एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करतात, जे गैर-इस्लामी आहे, असं या फतव्यामध्ये म्हटले आहे.
नवीन वर्ष साजरे करणे, शुभेच्छा देणे आणि कार्यक्रम आयोजित करणे इस्लामिक शरियतच्या दृष्टीने बेकायदेशीर आहे. नवीन वर्ष जानेवारीपासून सुरू होते जे इंग्रजांचे म्हणजेच ख्रिश्चनांचे नवीन वर्ष आहे. ख्रिश्चनांचा हा धार्मिक कार्यक्रम आहे जो ते दरवर्षी पहिल्या दिवशी साजरा करतात. यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात, हा पूर्णपणे ख्रिश्चनांचा "धार्मिक कविता" (धार्मिक कार्यक्रम) आहे, त्यामुळे मुस्लिमांना नवीन वर्ष साजरे करण्याची परवानगी नाही. इस्लाममध्ये अशा कार्यक्रमांना सक्त मनाई आहे, असं या फतव्यामध्ये म्हटले आहे.
तसेच नवीन वर्ष साजरे करणे, एकमेकांना शुभेच्छा देणे, फटाके फोडणे, टाळ्या वाजवणे, आवाज करणे, शिट्ट्या वाजवणे, दिवे बंद करून गोंधळ निर्माण करणे आणि नाचणे, गाणे, दारू पिणे, जुगार खेळणे, तुमच्या मोबाईलच्या व्हॉट्सॲपवरून एकमेकांना शुभेच्छा देणे, या सर्व कृती इस्लामी शरियतच्या विरोधात आहेत, असंही मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन यांनी फतव्यात म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world