Pune News: नववर्षानिमित्त लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासोबत सुरक्षिततेच्यादृष्टीने लोणावळा पर्यटनस्थळ परिसरात 30 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री 12 (AM) वाजेपासून ते 1 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 12 (AM) वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आदेश जारी केले आहेत.
वाहनांवर बंदी कुठे?
पुणे मुंबई, कामशेतकडे येणाऱ्या वाहनांवर पवनानगर बाजारपेठेत बंदी घालण्यात येणार आहे.
वाहतुकीच्या मार्गात कोणकोणते बदल करण्यात आले आहेत?
- येळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे-शिवली (विजय आडकर यांचे घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजुकडे)कोथुर्णे गाव येथून डावीकडे-कोथुणे, मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे-वारु फाट्यावरुन पुढे सरळ ब्राम्हणोली फाटा मार्गे जवण रोडवरुन फांगणे, ठाकुरसाई, खडक गेव्हंडे, जवण, चावसर, मोरवे, तुंग अशी वाहतूक वळवण्यात येत आहे.
- पवना नगर, कालेगाव, आंबेगाव, शिदगाव, पाले, धामनधरा, दुधीवरे बाजूस जाणारी वाहने तसेच जड, अवजड वाहने सोडण्यात येतील.
लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची माहिती
- येळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे-शिवली (विजय आडकर यांचे घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजुकडे)-कोथुर्णे गाव येथून डावीकडे-कोथुर्णे, मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे-वारु फाट्यावरुन पुढे सरळ ब्राम्हणोली एकेरी वाहतूक करण्यात येत आहे.
- मौजे ब्राम्हणोली, वारु, कोथुर्णे, शिवली येथील स्थानिक रहिवाशांना येळसे बाजूकडे येण्यास बंदी करण्यात आली असून वारु फाटा-ब्राम्हणोली फाटा-पवना नदी पूल-कालेगाव फाटा-पवना बाजारपेठ मार्गे येळसे कामशेत असे जाता येईल.
- पवनानगर बाजारातपेठेत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून जड,अवजड वाहनांना जाण्यास बंदी करण्यात येत आहे.
(नक्की वाचा: 31st December Upay For Money: थर्टी फर्स्टला जल्लोषाऐवजी करा दोन उपाय, होईल मोठा धनलाभ; वर्षभर कराल पार्टी)
वाहतुकीतील बदल पाहूनच प्रवासाचे नियोजन करा
1 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 12 (AM) वाजेपर्यंत तुंग, मोरवे, चवसर, जवन, खडक गेव्हडे, ठाकुरसाई, फांगणेकडून पवनानगर, कामशेतकडे जाणारी वाहने काले कॉलनी पवनानगरकडे जाण्यास मनाई करण्यात आलीय. तसेच ब्राम्हणोली फाटा उजवीकडे-वारु फाटा सरळ-मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरुन डावीकडे-कोथुर्णे गाव उजवीकडे-शिवली (विजय आडकर यांचे घरापासून डावीकडे येळसेबाजुकडे) येळसे ग्रामपंचायत फाटा मार्गे मुंबई पुणे, कामशेत कडे वळवण्यात येत आहे. पण पवनानगर, कालेगाव, आंबेगाव, शिंदगाव, दुधीवरे बाजूस जाणारी वाहने तसेच जड, अवजड वाहनांना सोडण्यात येईल.
(नक्की वाचा: GoodBye 2025 Wishes And Quotes: दुःखाला निरोप, सुखाला आमंत्रण; 31st December 2025निमित्त पाठवा खास शुभेच्छा)
नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन- ब्राम्हणोलीफाटा उजवीकडे-शिवली (विजय आडकर यांच्या घरापासून डावीकडे येळसे बाजुकडे) येळसे प्रामपंचायत फाटा अशी एकेरी वाहतूक करण्यात येत आहे.
- वारु ब्राम्हणोली येथील स्थानिक रहिवाशांनी पवना नदी पूल-कालेफाटा-पवना बाजारपेठेत येण्यास बंदी करण्यात येतेय.
- तसेच वारु फाटा-मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरुन डावीकडे कोथुर्णे गावातून पवनानगर बाजारपेठ अशी या पर्यायी मार्गे वळवण्यात येत आहे.
- नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असेही आदेश जारी केले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त | New Year 2026 Pune Security
नववर्षाचे स्वागत करताना पुणेकरांच्या उत्साहात आम्हीही सहभागी आहोत, तुमची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी!#NewYearBandobast#WelcomingSafety pic.twitter.com/aEVjfDxwJk
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) December 30, 2025
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world