
अहमदाबादहून इंग्लंडला 242 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग विमानाची मोठी दुर्घटना झाली. अहमदाबादहून उड्डाण घेतल्याच्या पुढील काही सेकंजात विमान खाली कोसळलं. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिविल एविएशन (DGCA) के अनुसार, एअर इंडिया B787 विमानने उड्डाण करताच एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) 'MAYDAY'चा कॉल केला होता. यानंतर ATC कडून विमानाला या कॉलसाठी काहीच प्रत्युत्तर मिळालं नाही.
आपात्कालिन परिस्थितीत पायलटने दिलेला 'MAYDAY' चा कॉल काय असतो? विमान कोसळण्याच्या काही सेकंदापूर्वी ATC ला हा कॉल का देण्यात आला? 'MAYDAY' कॉल एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त संकटकालीन कॉल आहे. एव्हिएशनच्या भाषेत एखादं विमान धोक्यात असेल तर हा कॉल दिला जातो. हा विमानन क्षेत्रात सर्वात आवश्यक संकटकालीन सिग्नल आहे.
नक्की वाचा - Air India Plane Crash : ब्लॅक बॉक्स काय असतो? विमान दुर्घटनेचं रहस्य कसं उलगडतं? जाणून घ्या यामागील तंत्रज्ञान
'मेडे' शब्द कुठून आला?
MAYDAY हा फ्रेंच शब्द 'm'aider'हून घेण्यात आला आहे. याचा अर्थ 'help me' म्हणजे मला वाचवा. MAYDAY कॉल सर्वसाधारपणे रेडिओच्या माध्यमातून ATC आणि त्याच्या जवळपासच्या इतर विमानांना पाठवलं जातं. या सिग्नलचा उपयोग तत्काळ सहाय्यतासाठी केला जातो. आपात्कालनी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आणि वेळेवर मदतीसाठी या शब्दाचा वापर केला जातो.
'मेडे' कॉल केव्हा दिला जातो?
MAYDAY कॉलचा वापर अनेक स्थितीत केला जातो. इंजिनमध्ये बिघाड, खराब हवामान, विमानात बिघाड किंवा प्रवाशाची तब्येत बिघडणे, अशा परिस्थितीत मेडे कॉल दिला जातो. मेडेचा कॉल मिळाल्यानंतर, एटीसी आणि इतर संबंधित अधिकारी ताबडतोब बचाव कार्य सुरू करतात. समजा एखाद्या विमानाचं इंजिन निकामी झालं तर अशा परिस्थितीत पायलट MAYDAY कॉल देते. ATC ताबडतोब त्या विमानाला लँडिंगसाठी प्राधान्य देईल आणि बचाव पथकाला सज्ज ठेवेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world