Ajit Pawar Death : अजितपर्व संपलं...अशी भावना आज महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीकडून व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (२८ जानेवारी २०२६) सकाळी ८.४५ वाजता बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या सह सहा जणांचा या अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रॅलीसाठी ते बारामतीला निघाले होते. दरम्यान त्यांच्या अकाली निधनाने अख्खा महाराष्ट्राला जबर धक्का बसला आहे. बारामतीतील प्रत्येक घरात आज शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान अजित पवार ज्या विमानाने मुंबईहून बारामतीला निघाले होते त्या विमानाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. (Which airplane was Ajit Pawar traveling)
अजित पवार कोणत्या विमानाने करीत होते प्रवास?
महाराष्ट्र राजकारणातील एक मोठं व्यक्तिमत्व अजित पवार यांचा ज्या विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवार सकाळी ८.१० च्या दरम्यान मुंबईहून बारामतीसाठी निघाले. ते VTSSK-LJ45 नावाच्या विमानाने प्रवास करीत होते. अपघातात ग्रस्त झालेलं विमान 'प्लॅटिनम एअर' या खाजगी चार्टर्ड कंपनीच्या मालकीचे होतं. हे विमान एक 'बिझनेस जेट' श्रेणीतील होतं. जे विशेषतः महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी वापरलं जात होतं. हे एक 'टर्बोप्रॉप' इंजिन असलेलं विमान होतं. जे कमी अंतराच्या प्रवासासाठी अत्यंत वेगवान मानलं जातं. या विमानात साधारणपणे ६ ते ८ प्रवासी बसण्याची सोय होती. प्राथमिक अहवालानुसार, विमानाचे नियमित मेंटेनन्स केले जात होते. मात्र, अपघाताच्या वेळी नेमकी तांत्रिक बिघाड झाली की हवामानाचा परिणाम झाला, याचा तपास अद्याप सुरू आहे.
Watch | #AjitPawar's last interview to NDTV was in the same Learjet 45XR aircraft that crashed today pic.twitter.com/92uuxRtxul
— NDTV (@ndtv) January 28, 2026
(अजित पवार यांचा मृत्यू याच विमानातून प्रवास करताना झाला)
नेमकं काय घडलं?
हे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीच्या काही अंतरापूर्वीच कोसळलं. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाला दोन वेळा लँडिग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दुसऱ्या वेळी लँडिंग करताना हा अपघात झाला. विमान जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट झाला. विमानाचा वेग आणि जमिनीवर झालेला आघात एवढा भीषण होता की विमानाचे तुकडे तुकडे झाले आणि त्याला आग लागली. अपघातानंतर घटनास्थळी धूर, आग लागली होती. तर ठिकठिकाणी कागदपत्र पसरले होते.
डीजीसीए (DGCA) कडून या विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' ताब्यात घेण्यात आला असून, विमानाने शेवटच्या क्षणी कोणता सिग्नल दिला होता आणि इंजिनमध्ये काही बिघाड झाला होता का, याची सखोल चौकशी केली जात आहे. कंपनीच्या परवान्याची आणि विमानाच्या उड्डाण क्षमतेची (Airworthiness) कागदपत्रे देखील तपासली जात आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world