जाहिरात

Ajit Pawar Plane Crash:अजित पवार इनके फ्लाईट को ठोक दिया, अमोल मिटकरींनी ऑडिओ क्लिप ऐकली, धक्कादायक गौप्यस्फोट

Ajit Pawar Plane Crash Case: ऑडिओ क्लिपमध्ये'अजित पवारजी के विमान को ठोक दिया' अशी भाषा वापरण्यात आल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी केलाय. नेमकं काय आहेत त्या ऑडिओ क्लिपमध्ये? वाचा सविस्तर बातमी...

Ajit Pawar Plane Crash:अजित पवार इनके फ्लाईट को ठोक दिया, अमोल मिटकरींनी ऑडिओ क्लिप ऐकली, धक्कादायक गौप्यस्फोट
"Ajit Pawar Plane Crash Case : ऑडिओमध्ये अजित पवारजी के विमान को ठोक दिया... अमोल मिटकरींचा धक्कादायक गौप्यस्फोट"
Amol MitkarI X

Ajit Pawar Plane Crash Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. गेल्या 13 दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पिंकी माळी यांच्या आईची सोमवारी (9 मार्च) मिटकरींनी भेट घेतली. या भेटीदरम्यान पिंकी माळी यांच्या भावाला 'VSR' कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याने व्हॉट्सॲप कॉल करून धमकावल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे.

"अजित पवार इनके फ्लाईट को ठोक दिया" | Ajit Pawar Inke Flight Ko Thok Diya, Claims Amol Mitkari 

मिटकरी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये असंही म्हटलंय की, "मी पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असता त्यांनी मला एक रेकॉर्डेड कॉल ऐकवला. यामध्ये व्ही. के. सिंग याने पिंकीच्या भावाला मीडियापासून दूर राहण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे या संभाषणात पायलटच्या संदर्भात 'अजित पवार इनके फ्लाईट को ठोक दिया' अशी भाषा वापरण्यात आली आहे. यावरून व्ही. के. सिंग यांचे अंडरवर्ल्डशी तर संबंध नाहीत ना? अशी दाट शंका उपस्थित होते."

(नक्की वाचा: Ajit Pawar Plane Crash: VSRच्या व्ही. के. सिंगचे अंडरवर्ल्डशी संबंध? पिंकी माळींच्या कुटुंबाला धमकी; अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप)

"आपल्या दादांचा घात झालाय" , अमोल मिटकरी भावुक | Amol Mitkari News | Ajit Pawar News

हे प्रकरण वरवर दिसते तितके साधे नाही, असे म्हणत मिटकरी यांनी पुन्हा एकदा घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये #JusticeForDada असा हॅशटॅग वापरत, "आपल्या दादांचा घात झालाय," असेही विधान केलंय. या ऑडिओ क्लिपमुळे आता तपासाची चक्रे फिरणार का? व्ही. के. सिंग यांच्या अडचणीत वाढ होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

(नक्की वाचा: Ajit Pawar Plane Crash Case: विधान परिषदेत अजित पवार अपघात प्रकरणी घडलेल्या गोष्टीमुळे दोन्ही NCP नाराज, नेमकं काय झालं?)

पिंकी माळी कुटुंबावर दबाव? | Pinky Mali Threat Call News

अपघातातील पीडित कुटुंबाला प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार देखील लवकरच या कुटुंबाची भेट घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, "व्ही.के.सिंगने पिंकी माळी यांच्या कुटुंबाला अप्रत्यक्ष धमकी दिलीय. तुम्ही पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांसमोर जाऊन तुमचा जीव धोक्यात घालू नका, अशा आशयाचे व्हॉट्सअ‍ॅप कॉल त्यांना येत असतील त्यांच्या कुटुंबांला संरक्षण मिळालंच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे व्ही.के. सिंगची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट त्या ऑडिओमध्ये कॅप्टन सुमित कपूरने अजित पवारजी के विमान को ठोक दिया तर ठोक देण्याची जी भाषा आहे, ती अंडरवर्ल्ड आणि क्रिमिनल लोकांची असते. मी मागच्या आठवड्यात पण म्हटलं होतं की व्ही.के. सिंगचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे व्ही.के. सिंगला कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करतंय, असं स्पष्ट दिसतंय. व्ही.के.सिंगची मस्ती आणि मगरुरी त्या ऑडिओमधून दिसली. त्यानंतर पिंकी माळी यांचं कुटुंबीय किती धाकात आहे, हे यावरून स्पष्ट होतं."

आमदार अमोल मिटकरी काय म्हणाले? ऐका संपूर्ण व्हिडीओ | Amol Mitkari | Ajit Pawar Plane Crash News

Listen to the latest songs, only on JioSaavn.com