अलिगड मुस्लीम विद्यापीठाला (Aligarh Muslim University) दिलेला अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील सीजेआय DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. धार्मिक समुदायाला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम 30 चा हवाला दिला. चीफ जस्टीस DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. 2005 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने अल्पसंख्याक संस्था म्हणून मान्यता देण्यास नकार दिला होता. अलिगढ मुस्लीम विद्यापीठाने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. 2006 मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, 2016 मध्ये राज्य सरकारने याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या रेग्युलर खंडपीठाकडे पाठविण्यात आलं आहे. अलीगड मुस्लीम विद्यापीठाची स्थापना अल्पसंख्याकांनी केली होती की नाही, याचा तपास या खंडपीठाकडून करण्यात येणार आहे.
जाणून घेऊया काय आहे या विद्यापीठाचा इतिहास?
अलिगड मुस्लीम विद्यापीठ भारतातील प्रमुख विद्यापीठांपैकी एक आहे. याची सुरुवात 1875 पासून झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रिटिशांच्या काळात कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या धर्तीवर अलिगढ मुस्लीम विद्यापीठ भारतातील पहिली उच्च शिक्षण संस्था होती. 1875 मध्ये सर सैयद यांनी मुस्लिमांना आधुनिक शिक्षण देण्याची गरज लक्षात घेऊन मुस्लीम अँग्लो ओरिएंटल शाळेची स्थापना केली. त्यावेळी खासगी विद्यापीठांना परवानगी नव्हती, त्यामुळे ही शाळेच्या रुपात सुरू करण्यात आली.
यानंतर त्याला मुस्लीम अँग्लो ओरिएंटल कॉलेजमध्ये बदलण्यात आलं आणि 1920 मध्ये याला अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. त्याच वर्षी ब्रिटीश सरकारच्या Central Legislative Assembly ने AMU अॅक्ट आणून केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. सर सैय्यद यांनी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी बराच संघर्ष केल्याचं म्हटलं जातं. त्यांनी यासाठी अनोख्या पद्धतीचा वापर केला. लोकांकडून निधी जमा करणे, नाटकात काम करणे आणि लोकांकडून मदत मागणे यातूनच विद्यापीठाची स्थापना झाली.
नक्की वाचा - जम्मू काश्मीर विधानसभेत पुन्हा राडा, खुर्शीद शेख यांना खेचून काढलं बाहेर
नाटक आणि संगीताचाही होतो अभ्यास...
AMU मध्ये आज 37 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. जे केवळ उत्तर प्रदेशातूनच नाही तर संपूर्ण भारतभरातून येतात. येथे 13 फॅकल्टी, 21 सेंटर आणि 117 विभाग आहेत. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी 80 वसतिगृहांसह 19 हॉल आहेत. AMU मध्ये तांत्रिक, व्यावसायिकसारखे अनेक विषय शिकवले जातात. ज्यात इंजिनियरिंग, मेडिकल, डेंटल, इस्लामिक सारख्या प्रमुख विभागांचा समावेश आहे.
याशिवाय AMU ने पश्चिम बंगाल, केरळ आणि बिहारमध्ये आपले तीन नवे केंद्र सुरू केले आहेत. विद्यापीठात खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचाही सहभाग असतो. येथे क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि घोडेस्वारीसाठी विशेष क्लब चालवले जातात. येथील सामान्य शिक्षण केंद्रात पाठ्यक्रमाव्यतिरिक्त नाटक, संगीत आणि साहित्यिक क्लब यांचं आयोजन केलं जात.
AMU मध्ये मुस्लीम विद्यार्थी किती?
द हिंदूने दिलेल्या बातमीनुसार, 1920 मध्ये स्थापना झालेल्या या विद्यापीठात तब्बल 70 टक्के मुस्लीम विद्यार्थी शिक्षण घेतात. तर 30 टक्क्यांहून जास्त हिंदू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय आणि कायदासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमात हिंदू विद्यार्थ्यांची संख्या 40 टक्क्यांपर्यंत असू शकते. वरिष्ठ माध्यमिकपर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी उर्दू अनिवार्य विषय असतो. त्यांना उन्नत हिंदी-प्राथमिक उर्दू किंवा उन्नत उर्दू-प्राथमिक हिंदीमधून एकाची निवड करावी लागते. विद्यापीठाच्या AMU च्या सर्व संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के जागा आरक्षित ठेवली जाते.
नक्की वाचा - सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांसंदर्भात महत्त्वाचा आदेश, आदेशामुळे मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा
AMU ची विद्यार्थी संघटना
अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील छात्र संघ अलिगड मुस्लीम विद्यापीठाचा अधिकृत विद्यार्थी संघटना आहे. याचं संविधान अमीन ए. बुलबुलिया यांच्याद्वारे लिहिण्यात आलं आहे.
AMU मध्ये प्रवेश कसा मिळेल?
अलिगड मुस्लीम विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ mucontrollerexams.com वर जाऊन फॉर्म भरावा लागेल आणि रजिस्टेशन करावं लागेल. मेरिट लिस्ट आणि वेटलिस्टनुसार कौन्सिलिंग प्रक्रियेत सामील होण्याची संधी मिळते. या प्रक्रियेच्या अंतर्गत पात्रता, योग्यता आणि अन्य आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची जागा निश्चित केली जाते. अधिकतर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी सीयूईटी परीक्षा पास करणं आवश्यक असतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world