Amul Milk Price Hike: लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. अमूल दूध दोन ते तीन रुपये किंमतीने महागले आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) देशभरामध्ये दुधाच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन रुपये प्रतिलिटर वाढ म्हणजे एकूण किंमतीत तीन-चार टक्के वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2023मध्ये अमूलने दुधाच्या किमती वाढवल्या होत्या.
(नक्की वाचा: टेन्शन विसरा, फॉलो करा Income टॅक्स वाचवण्याच्या टॉप 10 टिप्स)
कोणते दूध किती रुपयांनी महागले?
दूध | प्रमाण | पूर्वीचे दर | नवे दर |
अमूल गोल्ड दूध | 500 एमएल एक लिटर | 33 रुपये 64 रुपये | 34 रुपये 66 रुपये |
अमूल ताजा दूध | 500 एमएल एक लिटर | 27 रुपये 54 रुपये | 28 रुपये 56 रुपये |
अमूल गाईचे दूध | 500 एमएल एक लिटर | 28 रुपये 56 रुपये | 29 रुपये 57 रुपये |
अमूल म्हशीचे दूध | 500 एमएल एक लिटर | 35 रुपये 70 रुपये | 37 रुपये 73 रुपये |
अमूल स्लिम अँड ट्रिम (एसएनटी) | 500 एमएल एक लिटर | 24 रुपये 48 रुपये | 25 रुपये 49 रुपये |
(नक्की वाचा: अदाणी ग्रुपमधील गुंतवणुकीमुळे GQG पार्टनर्स मालामाल, 4.3 बिलियन डॉलरची गुंतवणूक 11.48 बिलियन डॉलरवर)
दुधाच्या किंमती का वाढवण्यात आल्या?
दरवाढीबाबत GCMMFने सांगितले की, "दूध उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्याने दुधाच्या किंमत वाढवण्यात आल्या आहेत. तसेच वर्षभरात अमूलच्या दूध संघांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दरामध्ये सहा ते आठ टक्क्यांनी वाढ केली आहे. अमूलच्या धोरणानुसार, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी ग्राहकांनी मोजलेल्या एक रुपयापैकी जवळपास 80 पैसे दूध उत्पादकांना जातात. दरवाढीमुळे दूध उत्पादकांना दुधाचे दर टिकून राहण्यास मदत होईल आणि त्यांना अधिक दूध उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल".
(नक्की वाचा: अदाणी पोर्ट्सद्वारे संचालित मुंद्रा बंदराचा विक्रम, भारतात आलेल्या सर्वाधिक क्षमतेच्या जहाजाने टाकला नांगर)