जाहिरात

Chandrababu Naidu : अदाणी समुहावरील आरोप खोटे, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची कबुली

Chandrababu Naidu : अदाणी समुहावरील आरोप खोटे, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची कबुली
N. Chandrababu Naidu
मुंबई:

अदाणी समुहाची  (Adani Group) कंपनी अदाणी ग्रीन (Adani Green Energy Ltd.) वर अमेरिकेत लावण्यात आलेल्या निराधार आरोपांवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (N Chandrababu Naidu) यांनी उत्तर दिलं आहे. या प्रकरणात ठोस पुरावे मिळेपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असं नायडू यांनी स्पष्ट केलं. आंध्र प्रदेशच्या वीजेसंबंधी हे प्रकरण आहे. त्यामध्ये नियमामुसार अदाणी ग्रीनला कंत्राट मिळाले आहे. 

चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेत राज्यातील यापूर्वीच्या सरकारशी संबंधित लाचखोरीच्या आरोपांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. पण, अमेरिकेतील न्याय विभाग आणि US-SEC ने केलेल्या आरोपांवर सर्व बाजूंनी जोरदार टीका होत होती. त्यानंतर हे आरोप निराधार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नायडू यांनी यापूर्वी लाचखोरीच्या कथित आरोपांवर अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि जगनमोहन रेड्डी प्रशासनावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता त्यावर त्यांनी भूमिका बदलली आहे. या प्रकरणात 'ठोस पुरावा' मिळेपर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याचं नायडू यांनी स्पष्ट केलं आहे. 

विजयवाडामध्ये पत्रकारांशी बोलताना नायडू म्हणाले की, 'ठोस पुरावे मिळेपर्यंत आम्ही कंत्राट रद्द करु शकत नाही. आम्हाला मोठा दंड द्यावा लागेल. आरोपांना बळ देणारे ठोस पुरावे मिळाले तरच या प्रकरणात कारवाई केली जाईल. 

( नक्की वाचा : Adani Enterprises ला 'बाय' रेटींग, वेंचुरा सिक्युरेटीजनं दिला सल्ला )
 

अमेरिकेतील लाचखोरीचं प्रकरण नोव्हेंबर महिन्यात समोर आलं होतं. त्यानंतर दुसऱ्यांदाच नायडू यांनी या विषयावर वक्तव्य केलं आहे. यापूर्वी त्यांनी 22 नोव्हेंबर रोजी विधानसभेत कारवाई करण्याचं अश्वासन दिलं होतं. त्यांनी हे आरोप हानीकारक असल्याचा दावा केला होता. त्याचबरोबर या प्रकरणात आणखी तथ्य येणं बाकी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

राज्याच्या विश्वासर्हतेचा प्रश्न

नायडू यांनी मंगळवारी सांगितलं, ' या प्रकरणात जगनमोहन रेड्डींवर कारवाई करायची असती तर तो माझ्यासाठी 'लड्डू मोमेंट' होता. पण, माझा सूडाच्या राजकारणावर विश्वास नाही. TDP आणि YSRCP यामध्ये हा फरक आहे. हा राज्य सरकारच्या विश्वासहर्तेचा प्रश्न आहे.'
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com