Crime News: पतीला क्रूरपणे संपवलं, नंतर मृतदेहाशेजारी पॉर्न पाहत बसली; प्रियकरासह पत्नीला अटक

लोकम शिवनगरजू असे मृत पतीचे नाव असून, त्याची पत्नी लक्ष्मी माधुरी आणि तिचा प्रियकर गोपी या दोघांनी मिळून हा कट रचला. सुरुवातीला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव करणाऱ्या या महिलेचे बिंग फॉरेन्सिक रिपोर्टमुळे फुटले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातून क्रूरतेचा कळस गाठणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. हत्येसाठी तिने चक्क पतीला झोपेच्या गोळ्या टाकून बिर्याणी खायला घातली आणि तो गाढ झोपेत असताना त्याची उशीने तोंड दाबून हत्या केली.

लोकम शिवनगरजू असे मृत पतीचे नाव असून, त्याची पत्नी लक्ष्मी माधुरी आणि तिचा प्रियकर गोपी या दोघांनी मिळून हा कट रचला. सुरुवातीला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव करणाऱ्या या महिलेचे बिंग फॉरेन्सिक रिपोर्टमुळे फुटले आहे.

हत्येचा थरारक घटनाक्रम

माधुरीचे गोपीसोबत अनैतिक संबंध होते. या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी तिने पतीच्या हत्येचा कट रचला. त्या रात्री तिने पतीसाठी बिर्याणी बनवली, ज्यामध्ये झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली होती. बिर्याणी खाल्ल्यानंतर शिवनगरजू गाढ झोपेत गेला. त्यानंतर माधुरीने प्रियकर गोपीला घरी बोलावून घेतले. दोघांनी मिळून झोपलेल्या शिवनगरजूच्या तोंडावर उशी दाबून त्याचा श्वास कोंडला आणि त्याला जीवे मारले.

(नक्की वाचा-  Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं! बस चालकाने मिनी बसमध्ये चिमुकलीवर केला अत्याचाराचा प्रयत्न)

मृतदेहाशेजारी बसून पाहत होती अश्लील व्हिडिओ

पोलीस तपासात एक अत्यंत विकृत बाब समोर आली आहे. पतीची हत्या केल्यानंतर माधुरीला कोणताही पश्चाताप झाला नाही. फॉरेन्सिक टीमने जेव्हा तिचा मोबाईल तपासला, तेव्हा असे दिसून आले की, पतीचा मृतदेह शेजारी असताना ती रात्रभर मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहत बसली होती.

Advertisement

(नक्की वाचा-  Akola News : 'करिष्मा, तुझी आठवण खूप सतावतेय, बाय… तुझ्याशिवाय जगू शकत नाही,'; इन्टाग्राम रीलने अकोला हादरलं!)

असा उघड झाला बनाव

हत्येला नैसर्गिक मृत्यूचे रूप देण्यासाठी माधुरीने सकाळी आरडाओरडा करून पतीला हार्ट अटॅक आल्याचे शेजाऱ्यांना सांगितले. मात्र, मृतदेहावरील जखमा आणि रक्ताचे डाग पाहून शिवनगरजूच्या वडिलांना संशय आला. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. शवविच्छेदनात मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे आणि छातीला झालेल्या दुखापतीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी खाक्या दाखवताच माधुरीने आपला गुन्हा मान्य केला. सध्या माधुरी आणि गोपी या दोघांनाही अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
 

Topics mentioned in this article