जाहिरात

Army Day 2025 : पुण्यात सैन्य दिनाच्या संचलन परेडचं आयोजन, रस्ते वाहतुकीत मोठे बदल

पुणे शहरात आज पहिल्यांदाच ‘सेना दिवस परेड’चं आयोजन करण्यात आलं असून परेडचे नेतृत्व मेजर जनरल अनुराग विज करतील.

Army Day 2025 : पुण्यात सैन्य दिनाच्या संचलन परेडचं आयोजन, रस्ते वाहतुकीत मोठे बदल

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

पुणे शहरात आज पहिल्यांदाच ‘सेना दिवस परेड'चं आयोजन करण्यात आलं आहे. 15 जानेवारी रोजी देशभरात सैन्य दिनाचं आयोजन केलं जातं. त्या निमित्ताने पुण्यात आयोजित केलेली परेड बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटर (बीईजी) येथे आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 7 वाजता सुरू होणारी ही परेड 11 वाजेपर्यंत चालेल. या वर्षीच्या परेडमध्ये विविध नवकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन होणार आहे. महिला अग्निवीरांचे पथक, आर्मी सर्व्हिस कॉर्प्सचे घोडेस्वार पथक, तसेच ड्रोन आणि रोबोटिक्ससह उन्नत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन हे या परेडचे मुख्य आकर्षण असतील.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सेना दिवस संचलन परेड अनुषंगाने आज पुण्यातील काही रस्ते बंद राहणार आहेत. सेना दिवस संचालन परेड निमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. सेना दिवस संचलन परेड अनुषंगाने चंद्रमा चौक ते होळकर ब्रिज दरम्यानच्या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. आज काही वेळासाठी रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शादलबाबा चौकाकडून चंद्रमा चौकमार्गे खडकीकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. विश्रांतवाडीकडून होळकर ब्रिज मार्गे खडकीकडे जाणारी वाहतूक बंद राहील. बापोडी चौक खडकी बाजार मार्गे चर्च चौक जनरल करीअप्पा मार्गावरुन मेथलिक चर्च अर्जन मार्ग पाचवड चौक येथून पुढे होळकर ब्रिज मार्गे येरवडा/विश्रांतवाडीकडे येणारी वाहतूक बंद आहे. पोल्ट्री फॉर्म चौक पोल्ट्री अंडरपासकडून आठमुळा रोडला जाण्यास प्रवेश बंद राहील. 

Pune Accident: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, महिला डॉक्टरचा करुण अंत; पुण्यातील दुर्दैवी घटना

नक्की वाचा - Pune Accident: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, महिला डॉक्टरचा करुण अंत; पुण्यातील दुर्दैवी घटना

नागरिकांसाठी हे असतील पर्यायी मार्ग

शादलबाबा - आंबेडकर चौक आळंदी जंक्शन साप्रस जुना होळकर ब्रिज मार्गे इच्छित स्थळी जावे

विश्रांतवाडी - साप्रस जुना होळकर ब्रिज मार्गे किंवा शादलबाबा संगमवाडी पार्टिल इस्टेट मार्गे पुढे इच्छित स्थळी

वाकडेवाडी - पाटील इस्टेट मार्गे इच्छित स्थळी जावे

वाकडेवाडी - पाटील इस्टेट-संगमवाडी शादलबाबा मार्गे पुढे

पुणे शहरात आज पहिल्यांदाच ‘सेना दिवस परेड'चं आयोजन करण्यात आलं असून परेडचे नेतृत्व मेजर जनरल अनुराग विज करतील. ज्यांना आर्टिलरी रेजिमेंटमधील त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी ओळखले जातं. पुण्यातील नागरिकांसाठी हा एक अभिमानास्पद क्षण आहे. ज्याद्वारे त्यांना भारतीय सैन्याच्या समृद्ध इतिहासाची आणि आधुनिक क्षमतांची झलक पाहायला मिळेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: