रेवती हिंगवे, पुणे: भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकी महिला जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी उंड्रीतील कानडे नगर येथे घडली. अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. प्रणाली तन्मय दाते ( वय,34, वर्ष रा.अर्बन नेस्ट सोसायटी,उंड्री) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात डॉक्टर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. प्रणाली तन्मय दाते असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डॉ. प्रणाली दाते या साडे बारा वाजण्याच्या सुमारास उंड्रीकडून हांडेवाडीच्या दिशेने जात होत्या. त्याच वेळेस मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली.त्या रस्त्यावर पडल्या असता त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता कि डोक्यातून बाहेर आलेला मेंदू रस्त्यावर छिन्नविछिन्न झाला.
( नक्की वाचा : 30-30 Scam : पोत्यानं पैसे देणाऱ्या संतोष राठोडनं मराठवाड्यातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा कसा केला? )
ट्रक चालक पांडुरंग बलभीम भोसले ( वय ३५ वर्ष,मूळ गाव तुळजापूर धाराशिव ) याने घटनास्थळावरुन पलायन केले मात्र त्याला सीसीटीव्हीच्या आधारे शोधून अटक करण्यात आली. दरम्यान, जड वाहतूक आणि डंपर वाहतुकीचे वाढते प्रस्त यामुळे हा भाग मृत्यूचा सापळा होत आहे. प्रशाशनाने यावर योग्य नियंत्रण असणे गरजेचे आहे. या भागात रोज छोटे अपघात होत असतात असा आरोप नागरिक करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world