VIDEO: केदारनाथ मंदिरामागे हिमस्खलन; भाविकांमध्ये भीतीचं वातावरण

केदारनाथ मंदिरामागील डोंगरावर बर्फाचे ढग दिसू लागले. यानंतर तेथे उपस्थित नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे भाविकांमध्ये धावपळ पाहायला मिळाली. 

Advertisement
Read Time: 2 mins

उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरामागील गांधी सरोवरच्या डोंगरावर हिस्खलन झाल्याची घटना घडली आहे. हिमस्खलनानंतर तेथे उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. 

रविवारी पहाटे 5.46 च्या सुमारास हिमस्खलनाची ही घटना घडली. अचानक केदारनाथ मंदिरामागील डोंगरावर बर्फाचे ढग दिसू लागले. यानंतर तेथे उपस्थित नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे भाविकांमध्ये धावपळ पाहायला मिळाली. 

(नक्की वाचा - लोणावळ्यात एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले; दोघांचा मृत्यू, 3 जणांचा शोध सुरु)

चोराबाडी ग्लेशियरचा काही भाग तुटला 

चोराबाडी ग्लेशियर तुटून कोसळल्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर आले. या भागात अनेक बांधकामे सुरू असून, त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे अशा हिमस्खलनाच्या घटना घडत असल्याचं शास्त्रज्ञांनी देखील मान्य केले आहे.

Advertisement

(नक्की वाचा- ताम्हिणी परिसरात पर्यंटकांना संप्टेंबरपर्यंत प्रवेश बंदी; खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाच निर्णय)

आपत्ती व्यवस्थापन आणि SDRF ची टीम घटनास्थळी 

घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, सेक्टर ऑफिसर केदारनाथ यांनी सांगितले की रविवारी सकाळी गांधी सरोवरच्या वरच्या टेकडीवर हिमस्खलन झाले. मात्र, या हिमस्खलनामुळे कोणतीही हानी झालेली नाही. या टेकडीवर असे हिमस्खलन सतत होत असल्याचे त्यांनी सांगितले. येथे जास्त बर्फवृष्टी होत असताना अशा घटना घडतात. 

Topics mentioned in this article