जाहिरात
20 hours ago

आज अयोध्येत एक भव्य दिव्य सोहळा रंगणार आहे. हा सोहळा आहे राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठेचा. रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनंतर आता राजाच्या रुपामध्ये रामाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रम 3 जूनलाच सुरु झाला आहे.  आज सकाळी 11 वाजून 25 मिनिटांनी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राच्या दरबारातील मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सुरु होईल. 11 वाजून 40 मिनिटांनी हा कार्यक्रम संपेल. त्यानंतर सीता मातेसह लक्ष्मण, हनुमंताच्या मूर्तींची देखील प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 

कर्नाटक सरकारची अखेर मोठी कारवाई, वरिष्ठ पोलिस अधिकारी निलंबित

आरसीबीच्या विजयी जल्लोषावेळी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर कर्नाटक सरकारने मोठी कारवाई केली आहे. बेंगळुरूचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.  

रशियाचा यूक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला

रशियाचा यूक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला

यूक्रेनच्या खारकिवमध्ये मोठे स्फोट

यूक्रेनी झोपेत असतानाच रशियाचा हल्ला

यूक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांना रशियाचं प्रत्युत्तर

कोल्हापूरच्या बावडा, शिये, भुयेवाडी गावात मुसळधार पाऊस

बावडा, शिये, भुयेवाडी गावात मुसळधार पाऊस 

गेल्या चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसान पुन्हा जोर धरला 

ढगफुटीसदृश्य पावसामुळे रस्त्यावर पाणी 

वाहतुकीला अडथळा

शिवसेना शिंदे गटाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आमदार

अक्कलकोट येथे सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शरद पवार गटाचे आमदार राजू खरे 

आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदेचे स्वागत करणारी जाहिरात देखील आज राजू खरे यांनी दिली होती 

त्यानंतर आता थेट शिवसेनेच्या व्यासपीठावरचं मोहोळचे आमदार राजू खरे पोहोचल्याने राजकीय चार्चना उधाण 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे हे पण मंचा वर उपस्थित

आग विझल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा

चर्चगेट स्थानकात भीषण आग लागली आहे. त्यामुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली आहे.   शॉक सर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.  आग विझवण्यात आली असल्याची  रेल्वे प्रशासनाची माहिती आहे.  सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

चर्चगेट स्थानकातील केकच्या दुकानाला आग

चर्चगेट स्थानकात केकच्या दुकानाला आग लागल्याची माहिती. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. आगी मुळे प्रवाशांची धावपळ झाली आहे. चर्चगेट स्थानकात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. स्थानकात सध्या मोठ्या प्रमाणात धूर दिसून येत आहे. चर्चगेट स्थानकातील दुकानांना केवळ आग लागल्याचं ही समजत आहे. 

चर्चगेट रेल्वे स्टेशनला आग लागण्याची घटना

चर्चगेट रेल्वे स्टेशनला आग लागण्याची घटना

कॅन्टींगला आग लागल्याची प्राथमिक माहिती

चिन्नास्वामी चेंगराचेंगरी प्रकरणी RCB अडचणीत

चिन्नास्वामी चेंगराचेंगरी प्रकरणी RCB अडचणीत

सोशल मीडियाद्वारे विजयी रॅलीसाठी समर्थकांना परस्पर दिलेल्या आमंत्रणाची होणार चौकशी

आरसीबी फ्रेंचायजी व्यवस्थापनाने 4 जून रोजी केली होती विजयी रॅली आमंत्रणाची पोस्ट

पोलिसांशी कोणतीही चर्चा न करता परस्पर केली होती विजयी रॅलीची घोषणा

विजयी मिरवणुकीला परवानगी न दिल्याबद्दल पोलिसांनी त्यावेळही केला होता खुलासा

दोन दिवसांनंतर विजयी मिरवणूक काढण्याचा पोलिसांनी आरसीबी फ्रेंचाईजीला दिला होता सल्ला

तरीही आरसीबीच्या आग्रहामुळे चिन्नास्वामी स्टेडियमवरील सोहळ्याला दिली होती परवानगी 

आरसीबी मॅनेजमेंट आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची पोलिस करणार चौकशी

कोकण रेल्वे मार्गावर ६७६ कर्मचारी ठेवणार वॉच, पावसाळी हंगामासाठी रेल्वे प्रशासन सज्ज

कोकण रेल्वे मार्गावर उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी  676 कर्मचारी रेल्वे मार्गावर दिवस-रात्र वॉच ठेवणार आहेत.  बेलापूर रत्नागिरी ते मडगाव या मार्गावर 24 नियंत्रण करू कार्यरत राहणार आहे.असुरक्षित ठिकाणी 24 तास जागता पहारा ठेवण्यात येणार आहे.  रेल्वे मार्गावरील नऊ स्थानकांवर सेल्फ रेकॉर्डिंग पर्जन्यमापक बसवण्यात येणार आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ६ वैद्यकीय पथक तैनात करण्यात आली आहेत.

1 करोडचे बक्षीस असलेला नक्षलवादी नरसिंहचलम उर्फ ​​गौतमला केलं ठार

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवादाविरुद्ध सुरक्षा दलांची कारवाई सुरूच आहे. गुरुवारी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात आणखी एक मोठी चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा सीसी सदस्य नरसिंहचलम उर्फ ​​गौतम उर्फ ​​सुधाकर याला ठार मारले आहे. सुधाकर हा नक्षलवाद्यांच्या शिक्षण विभागाचा प्रमुख होता आणि त्याच्या डोक्यावर 1 करोड चे बक्षीस होते. तो आंध्र प्रदेशातील चिंतापलुडीचा रहिवासी आहे.

Live Update : सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण...

सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण...

शिंदेंच्या मेळाव्यातून जिल्हा संपर्कप्रमुख असलेल्या शिवाजीराव सावंत यांचा फोटो गायब

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर अक्कलकोट दौऱ्यावर

शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत समर्थक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  दौऱ्याकडे पाठ फिरवण्याची शक्यता...

शिवसेनेच्या संपर्कप्रमुखाला बाजूला ठेवूनच जाहिरातीसह मेळाव्यांचे झाले नियोजन...

स्थानिक जाहिरातीतून शिवाजीराव सावंत यांचा फोटो गायब

Live Update : नाशिक महापालिकेसाठी मंत्री गिरीश महाजन यांनी दिला 100 प्लसचा नारा

- नाशिक महापालिकेसाठी मंत्री गिरीश महाजन यांनी दिला 100 प्लसचा नारा

- युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल मात्र भाजप 100 जागा विजयी होईल असा केला विश्वास व्यक्त

- नाशिकमध्ये आयोजित भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेत गिरीश महाजन यांचे विधान

- महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागण्याच्या सूचना

- सूत्रसंचालकांकडून गिरीश महाजन यांचा संभाव्य पालकमंत्री म्हणून देखील बैठकीत उल्लेख

Live Update : भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भरले रेल्वे अधिकाऱ्यांनी थकवलेले पैसे

- भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भरले रेल्वे अधिकाऱ्यांनी थकवलेले पैसे 

- 2022 साली रेल्वे अधिकारी रुक्मिणी मीना यांनी सावरकरांचे पुस्तक केले होते खरेदी मात्र पैसे देण्यास टाळाटाळ

- रवींद्र चव्हाण यांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ भरले पैसे 

- याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलून अधिक माहिती घेणार

- रुक्मिणी मीना या अधिकाऱ्याने मुद्दाम पैसे थकवले असतील तर मेमो काढण्यासाठी मागणी करणार

Live Update : अयोध्येत रामदरबाराच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात, 'राम'नगरी पुन्हा सजली

अयोध्येत रामदरबाराच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात, 'राम'नगरी पुन्हा सजली

Live Update : तुळजापुर ड्रग्स तस्करीबाबत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

तुळजापुर ड्रग्स तस्करी प्रकरणात ठाकरे गटाचे धारशुवचेबखासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी आरोपीना वाचवण्यासाठी अनेक त्रुटी केल्या असून मुंबई व सोलापूर येथील मुख्य आरोपींची नावे समोर येऊनही त्यांना अभय देण्यात आले आहे. पोलीस आरोपींना जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत असून आरोपींवर मकोको अंतर्गत कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी दिलीय. तपासात मोठ्या चुका असुन आरोपीना अभय दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सर्व कागदपत्रे दाखवणार आहेत. भाजपचे तुळजापुरचे आमदार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना तुळजापूरात ड्रग्ज तस्करी होत असल्याची माहिती डिसेंबर २०२३ मध्येच माहीती होती तर प्रत्यक्षात प्रथम गुन्हा दाखल होण्यास १ वर्षे १ महिण्याचा कालावधी का लागला असा असा प्रश्न उपस्थित करत १ वर्षाच्या कालावधीत केवळ निवडणुका डोळयासमोर ठेवून किंवा राजकीय स्वार्थापोटी आ.राणा पाटील त्यांनी पोलिसांना काही सांगितले नसल्याचा आरोप देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. 

Live Update : अमरावतील मेळघाटमध्ये भूकंप, 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भुकंपाचे जाणवले धक्के

अमरावतील मेळघाटमध्ये भूकंप, 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भुकंपाचे जाणवले धक्के
 

- अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भूकंपाचा झटका जाणवला....

 

- 9 वाजून 57 मिनिटांवर 3.8 तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे... 

- जिल्हा प्रशासन अधिकची माहिती घेत आहे...

Live Update : पुरंदर विमानतळासाठी आलेल्या हरकतीवर येत्या सोमवारपासून सुनावणी

पुरंदर विमानतळासाठी आलेल्या हरकतीवर येत्या सोमवारपासून सुनावणी 

विमानतळ करण्यासाठी सात गावातील नागरिकांनी विरोध दर्शवला होता त्यासाठी हरकती मागविण्यात आल्या होत्या. 

सात गावातील सुमारे 2052 नागरिकांनी हरकती नोंदवले आहेत. सासवडला येत्या सोमवारपासून त्याची सुनवाणी होणार आहे. 

गावनिहाय सुनावण्या होणार असून आठवडाभर ही सुनावणी चालणार आहे. 

जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच भूसंपादन करण्याबाबतच्या नोटीसा या भागातील शेतकऱ्यांना दिल्या आहेत. 

या नोटीसामुळे भूसंपादन करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.

Live Update : आज भाजपची नाशिक विभागीय संघटनात्मक बैठक

नाशिक - भाजपची नाशिक विभागीय संघटनात्मक बैठक 

सकाळी 11 वाजता सिडको परिसरात पार पडत असून यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, संजय सावकारे, राम शिंदे उपस्थित राहणार आहेत. बडगुजर यांना आजही भाजपमध्ये येण्यास विरोध दर्शविला जाऊ शकतो 

Live Update : मनसेला राऊतांच्या पुस्तकाची भुरळ?

मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचा नवा अध्याय लिहिला जाणार का अशी चर्चा आता सुरू झालीय आणि याचं कारण ठरतंय ते संजय राऊत यांचं पुस्तक. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांच्या नरकातल्या स्वर्ग पुस्तकाचं वाचन करायला सुरूवात केलीय याची पोस्ट संदीप देशपांडे यांनी केलीय, यावेळी लपवण्यासारखे काहीही नाही असंही म्हटलंय, त्यामुळे राऊतांचं हे पुस्तक राज्याच्या राजकारणाचा इतिहास बदलणारं ठरणार का हे पाहावं लागणार आहे

Live Update : 1 मार्च 2027 पासून चार राज्यांमध्ये जातीय जनगणना होणार

1 मार्च 2027 पासून चार राज्यांमध्ये जातीय जनगणना होणार , लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधून जनगणेला होणार सुरुवात 

Live Update : समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण

समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण, ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी होणार खुला

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com