One Year Of Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील राम मंदिराला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. 500 वर्षांपासून प्रभू श्रीरामांचा 500 वर्षांचा वनवास संपला आणि अयोध्येमध्ये भव्यदिव्य राममंदिर निर्माण झाले. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. अवघा देश त्यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी गरजत होता. या राममंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या एका वर्षात राममंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आणि त्यांनी दिलेल्या देणग्यांनी नवे विक्रम तयार केले. जाणून घ्या त्याची ही खास आकडेवारी..
बरोबर एक वर्षापूर्वी 22 जानेवारी 2024 रोजी, अयोध्येत बांधलेल्या भव्य राम मंदिराचा उद्घाटन आणि 'प्राण प्रतिष्ठा' सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील सेलिब्रेटी, राजकीय नेते या सोहळ्याला उपस्थित होते. राम मंदिराच्या 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर सध्या अयोध्या नगरीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जय श्रीरामच्या घोषणांनी शहर दणाणून गेले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राम मंदिराला वर्ष पूर्ण..
गेल्या वर्षी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात कूर्म द्वादशीला राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' साजरी करण्यात आली होती, त्यामुळे अयोध्येत 11 जानेवारीपासून एक भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. या भव्य सोहळ्यात लाखो भाविक रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. आजही अयोध्येतील राम मंदिर आणि प्रभू श्रीरामांची मुर्ती फुलांनी सुंदरपणे सजवण्यात आली आहे. संपूण अयोध्या नगरीत भाविकांची गर्दी पाहायला मिळत असून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक शहरात दाखल झालेत.
अयोध्येत राम मंदिराच्या स्थापनेपासून प्रत्येक दिवशी दर्शनसाठी भाविकांची लांब रांग पाहायला मिळते. हे ऐतिहासिक राम मंदिर पाहण्यासाठी आणि रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी केवळ देशातीलच नाही तर परदेशातूनही पर्यटक येथे येतात. याआधी दरदिवशी सुमारे ७० ते ८० हजार भाविक दर्शनासाठी पोहोचत होते, तर ५ जानेवारीपासून दररोज सुमारे दोन ते दीड लाख भाविक अयोध्येत दर्शनासाठी येत आहेत.
किती मिळाली देणगी?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या एका वर्षात राम मंदिराने सुमारे 400 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. राम मंदिराचे वार्षिक उत्पन्न फक्त एका वर्षात देशातील इतर मंदिरांच्या उत्पन्नाइतकेच झाले आहे. मंदिरात 50 लाख रुपयांपर्यंत दैनंदिन देणगी गोळा होते. गेल्या आर्थिक वर्षात राम मंदिराला 363 कोटी 34 लाख रुपयांची देणगी मिळाली. तर आत्तापर्यंत राम मंदिराला विविध माध्यमातून 500 कोटींची देणगी मिळाली आहे, ज्यामध्ये 13 क्विंटल चांदी आणि 20 किलो सोने देखील समाविष्ट आहे.
( नक्की वाचा : $TRUMP Meme Coin : ट्रम्प सत्तेवर येण्यापूर्वी जगभर खळबळ, एक पोस्ट आणि गुंतवणूकदारांना 8000% फायदा )
एका वर्षात अयोध्येला भेट देणाऱ्या भाविकांची एकूण संख्या सुमारे 18 कोटींवर पोहोचली आहे. पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2024 ते सप्टेंबर 2024 पर्यंत अयोध्येला भेट देणाऱ्या भाविकांची एकूण संख्या 16.70 कोटी असल्याचे सांगितले जात होते. यानंतर अयोध्येत अनेक मोठ्या घटना घडल्या, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचले. भाविकांचे आगमन अखंड सुरूच आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मते, मंदिराच्या देणगी खात्यात आतापर्यंत 3200 कोटी रुपये जमा झाले आहेत. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 18 कोटी रामभक्तांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी वेगवेगळ्या बँकांकडून 3200 कोटी रुपये दान केले आहेत. कथाकार मोरारी बापूंनी11. 3 कोटी रुपयांची सर्वाधिक मोठी देणगी दिली आहे. अमेरिका, कॅनडा आणि युनायटेड किंग्डममध्ये राहणाऱ्या मोरारी बापूंच्या विविध अनुयायांनी एकत्रितपणे 8 कोटी रुपयांची देणगी दिली.हिरे कंपनी श्री रामकृष्ण एक्सपोर्ट्सचे मालक गोविंदभाई ढोलकिया यांनी 11 कोटी रुपयांची देणगी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world