17 जानेवारीला क्रिप्टो करन्सीच्या बाजारात मोठी उलथापालथ झालीय. बाजारात एक नवं टोकन आलं, आणि अवघ्या काही मिनिटात क्रिप्टो बाजारातल्या सट्टेबाजांनी त्यावर उड्या घेतल्या. अमेरिकचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे कॉईन लाँच केलं. त्यांनी स्वतःच क्रिप्टोवाल्यांसाठी त्यांच्या अधिकृत x हँडलवरुन नवं क्रिप्टो मीमकॉईन जारी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर बाजारात सुनामी आली. $TRUMP नावाचं हे मीम कॉईन सोलन नावाच्या प्लॅटफॉर्मवर रिलीज झालं. अगदी काही क्षणातच जवळपास सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या मीमकॉईनची चर्चा सुरु झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाढता वाढता वाढे....
क्रिप्टोटाईम्स नावाच्या वेबसाईटनुसार मीमकॉईन लॉन्च झाल्यावर अवघ्या दोन तासात त्याची किंमत 4200% वाढली. पहिल्या दोन तासातया कॉईनचं मार्केट व्हॅल्यूएशन 7.70 अब्ज डॉलरवर पोहचलं. अचानक लॉन्च झालेल्या मीमकॉईनमुळे बाजारात संभ्रम आणि Fear Of Missing Out सारखं वातावरण निर्माण झालं.
गुंतवणूकदारांचा ओघ इतका प्रचंड होता की काही तासांमध्ये त्यामध्ये तब्बल 800 टक्के वाढ झाली. पाहता-पाहात मार्केट कॅप 15 अब्ज डॉलरच्याही पुढे गेला. मार्केट कॅप 10 अब्ज डॉलरच्या पुढे गेलं त्यावेळी एसएंडपीनं गेल्या 40 वर्षातील रिर्टन्सला मागे टाकलं. मार्केट कॅपचा वेग इतका वेग होता की ट्रम्प यांचं अकाऊंट कुणी हॅक केलं आहे का? अशी शंका लोकांना वाटू लागली.
( नक्की वाचा : Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर चीनची झोप का उडाली आहे? )
90 सेकंदात बदललं नशीब
TRUMP मीम कॉईनची क्रिप्टो बाजारातली एन्ट्री स्फोटक ठरलीय. लाखो गुंतवणूकदार या मीम कॉईनकडे आकर्षित झालेत. पण त्यापाठोपाठ आता TRUMP मीम कॉईनच्या चोऱ्यांची ही सोशल मीडियावर चर्चा आहे. असं असलं, TRUMP कॉईन आणि ट्रेडर्सच्या नफ्याचीच क्रिप्टो बाजारात चर्चा आहे. यानिमित्ताने मीम कॉईन म्हणजे काय हेही समजून घेऊयात
काय आहे मीम कॉईन?
मीम कॉईन म्हणजे क्रिप्टोकरन्सीतून प्रेरणा घेऊन तयार झालेले कॉईन.मीमची सुरुवात एखादा विनोद म्हणून होते, आणि ते मीम व्हायरल होतं. ते इतकं लोकप्रिय होतं..त्या लोकप्रियतेची किंमत ठरते आणि ही किंमत मीमकॉईन जेवढं लोकप्रिय होईल तितकी वाढत जाते.कोरोनाच्या काळात शिबा इन आणि डोज काईन हे मीम कॉईन चर्चेत आले होते.
दीड वर्षापूर्वी जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ता इलोन मस्क यांनी डोज कॉईन देऊन ग्राहकांना टेस्ला कार खरेदी करता येईल अशी घोषणा केली. तेव्हापासून मीमकॉईनचं महत्व आणखी वाढलंय
ट्रम्प सत्तेवर येणार हे निश्चित झाल्यानंर इलोन मस्क यांच्या मालकीच्या डोज या मीमकॉईनच्या किंमतीही अशाच गगनाला भिडल्या. त्याचप्रमाणे अमेरिकेतील सरकारी खर्च क्रिप्टो करन्सीमध्ये करण्यासाठी आवश्यक बदल करण्याची घोषणा मस्क यांनी केली. त्यामुळेच क्रिप्टोचा बाजार गरम आहे. त्यात स्वतः ट्रम्प यांनीच एका मीम कॉईनची भलावण केल्यावर त्याचा फायदा गुंतवणूकदारांना झाला नसता तरच नवलं...
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world