जाहिरात

Ram Mandir : अयोध्या राम मंदिरात चोरी प्रकरणात 8 आरोपींच्या घरी एकाचवेळी छापेमारी; पोलिसांना काय सापडलं?

अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीच्या प्रकरणात सध्या कारागृहात असलेल्या आठ आरोपींच्या घरी रविवारी सकाळी ७ वाजता पोलिसांनी छापे टाकले.

Ram Mandir : अयोध्या राम मंदिरात चोरी प्रकरणात 8 आरोपींच्या घरी एकाचवेळी छापेमारी; पोलिसांना काय सापडलं?

Ayodhya Ram Mandir donation theft case : अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीच्या प्रकरणात सध्या कारागृहात असलेल्या आठ आरोपींच्या घरी रविवारी सकाळी ७ वाजता पोलिसांनी छापे टाकले. पोलिसांच्या आठ पथकांनी एकाच वेळी या आरोपींच्या निवासस्थानांवर छापे घातले. यापैकी तीन-चार आरोपींची घरे बंद आढळली. पोलिसांनी त्यांच्या शेजाऱ्यांकडे चौकशी केली आणि इतर आरोपींच्या कुटुंबीयांचीही विचारपूस केली.

दरम्यान, ५-६ अधिकाऱ्यांकडून आरोपी अविनाश शुक्लाच्या कुटुंबाची चौकशी करण्यात आली. तो भाड्याच्या घरात राहतो. सुमारे पाच ते सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने कुटुंबीयांची चौकशी केली आणि पुरावे गोळा केले. दुसरीकडे आरोपी सुभाष श्रीवास्तव यांच्यावरील आरोप समजण्यापलीकडील असल्याचं शेजाऱ्यांचं म्हणणं आहे. तर आरोपी अनुकल्प मिश्राच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तिथेही छापेमारी करण्यात आली. 

नक्की वाचा - Ram Temple: CCTV कॅमेरा झाकला, चोरीचे पैसे वॉशरुममध्ये लपवले; राम मंदिरातील कोट्यवधींच्या लुटीची Inside Story

विशेष म्हणजे, मंदिर ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून २५ जून रोजी दाखल करण्यात आलेल्या पहिल्या एफआयआरनंतर  तिन्नूसह आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. २६ जून रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी  न्यायालयाने या आरोपींना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान, शनिवारी 'श्री राम जन्मभूमी ट्रस्ट'ने चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्याला दुजोरा दिला.

कोणावर कोणती जबाबदारी होती?

1 रामशंकर यादव (टिन्नू) 
मंदिरातील जबाबदारी - देणगीच्या पेट्यांची काळजी घेणे, त्या तळघरात घेऊन जाणे.
आरोप - दानपेटीतून कोट्यवधी रुपयांचा अपहार, अयोध्या आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मालमत्ता उभारली.

2 लवकुश मिश्रा
मंदिरातील जबाबदारी - देणग्या आणि रोख रक्कम मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक 
आरोपः देणगी चोरून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, घरातून १२ लाख रुपये जप्त

3 अनुकल्प मिश्रा
मंदिरातील जबाबदारी- हिशोबाच्या खोलीत पैसे मोजण्याचं काम 
आरोपः मंदिराच्या हिशोब खोलीतून पैसे चोरून स्नानगृहात लपवले

4 सुभाष चंद्र श्रीवास्तव
मंदिरातील जबाबदारी- रोकड मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रभारी 
आरोपः पर्यवेक्षणात हलगर्जीपणा आणि देणगी निधीच्या चोरीत सहभाग

5 करुणेश पांडे
मंदिरातील जबाबदारी- देणगीचे पैसे खोलीत आणून मोजणे
आरोपः देणगी म्हणून मिळालेले पैसे चोरून अयोध्येच्या आसपास मालमत्ता खरेदी 

6 मनीष यादव
मंदिरातील जबाबदारी - दानपेट्यांमध्ये जमा झालेल्या देणग्यांची मोजणी 
आरोपः मंदिरातील प्रसादाची चोरी, छाप्यात घरातून ३६ लाख जप्त 

7 अविनाश शुक्ला
मंदिरातील जबाबदारी -देणगीचे पैसे खोलीत आणून मोजणे
आरोपः कुटुंबाला दान म्हणून मिळालेले पैसे चोरून अयोध्येच्या आसपास मालमत्ता खरेदी 

8 रमाशंकर मिश्रा
मंदिरातील जबाबदारी - देणगीच्या पेट्यांवर देखरेख 
आरोपः इतर आरोपींसोबत मिळून देणगी म्हणून मिळालेल्या पैशांचा अपहार 

या महिन्याच्या सुरुवातीला ६ जून रोजी राम मंदिराच्या देणगी व्यवस्थापनात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्याच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आणि आठ आरोपींना अटक करण्यात आली. तपासात बँक कर्मचाऱ्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आली असून हा गैरव्यवहार एकट्या काही कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नसून मोठे जाळे कार्यरत होते का? याचा तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे राम मंदिराच्या देणगी व्यवस्थापन आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com