जाहिरात

Rapido Rider: "भैया मत करो...", धावत्या बाईकवर महिलेसोबत भयंकर घडलं, VIDEO आला समोर

According to the police complaint, the incident occurred at around 4 pm on Thursday. The Wilson Garden Police has filed an FIR.

Rapido Rider: "भैया मत करो...",  धावत्या बाईकवर महिलेसोबत भयंकर घडलं, VIDEO आला समोर
  • A Rapido rider in Bengaluru has been charged for allegedly misbehaving with a woman passenger
  • The woman said the bike taxi rider tried to grab her legs while they were travelling to her destination
  • The woman filed a complaint, following which the police registered an FIR and launched a probe
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

रॅपिडो बाईक टॅक्सीच्या एका चालकाने महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. रायडरने बाईक चालवत असताना महिलेचा पाय पकडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महिलेने घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर बंगळुरूच्या या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. विल्सन गार्डन पोलिसांनी या प्रकरणी तातडीने एफआयआर (FIR) दाखल केला असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. या संपूर्ण घटनेवर रॅपिडोकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

(नक्की वाचा- CCTV Footage: दुकानात शिरली, मिरचीपूड फेकली, तरीही प्लॅन फसला; महिला चोराला चांगलीच अद्दल घडली)

इंस्टाग्राम पोस्टमध्ये महिलेने सांगितला अनुभव

पीडित महिलेने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये या भयानक अनुभवाचे वर्णन केले आहे. "चर्च स्ट्रीटवरून मी माझ्या पेईंग गेस्ट (PG) कडे परत येत असताना रॅपिडो रायडरने बाईक चालवत असताना माझे पाय पकडण्याचा प्रयत्न केला. हे सगळं इतकं अचानक घडलं की, तिला सुरुवातीला काय घडलं हे कळलंच नाही. तिने पुढे सांगितले की, "जेव्हा त्याने हे दुसऱ्यांदा केले, तेव्हा मी त्याला 'भैया, क्या कर रहे हो, मत करो' असे सांगितले. पण त्याने गैरवर्तन थांबवले नाही."

(नक्की वाचा-  पुणे-छत्रपती संभाजीनगर 8 तासांचा प्रवास 3 तासांवर येणार; 'या' शहरांना होणार मोठा फायदा)

बाईक का थांबवली नाही?

या प्रकारानंतरही बाईक थांबवायला का सांगितले नाही, याबद्दल महिलेने सांगितले की, ती त्या जागेसाठी नवीन होती आणि बाईक कुठे जात आहे, याची तिला कल्पना नव्हती. त्यामुळे भीतीपोटी ती त्याला बाईक थांबवण्यास सांगू शकली नाही.

महिलेला तिच्या पीजीजवळ पोहोचवल्यानंतर जवळच उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने महिलेला काय झाले, याची विचारणा केली. सगळा प्रकार कळाल्यानंतर त्या व्यक्तीने रॅपिडो रायडरला जाब विचारला. रायडरने माफी मागितली आणि तो पुन्हा असे करणार नाही असे सांगितले, असे महिलेने पोस्टमध्ये नमूद केले. आपल्यासोबत झालेला हा अनुभव इतर कोणत्याही महिलेसोबत होऊ नये, या उद्देशाने तिने ही पोस्ट शेअर केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com