
Zepto Delivery Boy Earning Per Week : अचानक घरातील किराणा सामान संपलं तर तात़डीने ऑनलाइन ऑर्डर देताच पुढच्या दहा मिनिटात डिलिव्हरी बॉय सामान घेऊन तुमच्या दारात हजर होतो. तुम्हाला वाटत असेल की, डिलिव्हरी बॉयच्या कामात खूप मेहनत आणि कमाई अत्यल्प असते. मात्र सत्यस्थिती काहीतरी वेगळीच आहे. झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयबाबत तुम्ही आतापर्यंत जो विचार करीत होता तो खोटा ठरला आहे. स्वत: एका डिलिव्हरी बॉयने आपली कमाई सोशल मीडियावर शेअर केली आहे.
बंगळुरूतील एका झेप्टो डिलिव्हरी बॉयची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांना डिलिव्हरी बॉयचं काम खूप साधारण वाटतं. मात्र या तरुणाच्या मेहनतीमुळे त्याने मोठं यश संपादन केलं आहे.
पावसात चांगली कमाई
रेडिटवर त्याने आपल्या कमाईची पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने सांगितल्यानुसार, तो सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत १२ तास काम करतो. एका आठवड्यात त्याने ३८७ ऑर्डर डिलिव्हर केले आणि पेट्रोलचा खर्च काढल्यानंतर त्याच्याकडे १८,९०६ रुपये शिल्लक राहिले. या पोस्टमध्ये झेप्टो एजंटने सांगितलंय, पावसामुळे त्याची कमाई वाढली. पावसामुळे लोकांनी जास्त ऑर्डर केल्या. त्यावेळी घराबाहेर निघणं कठीण होतं. त्याने या आठवड्यात एकूण २१ हजार कमावले. एकदा केवळ ३ दिवस काम केलं तरीही १२ हजार रुपये कमावले. कारण दोन दिवस सलग सायंकाळी ६ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत पाऊस होता. पावसामुळे त्याच्या अडचणी वाढल्या नाही तर त्याला संधी मिळाली.
What I earned in a week (working morning 10am to night 10pm) as zepto delivery
byu/samfucku inSideHustlePaglu
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल...
झेप्टो डिलिव्हरी एजंटची ही कहाणी लोकांना प्रेरणा देत आहे. झेप्टो इतके पैसे देतो, यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये. अनेकांनी त्याच्या मेहनतीचं कौतुकही केलं आहे. ही कहाणी हेच सांगते की डिलिव्हरी करण्याचं कामं योग्य पद्धतीने आणि मिळालेल्या संधीचा फायदा घेत केला तर चांगली कमाई होऊ शकते. बंगळुरूसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन ऑर्डर केली जाते, तेथे पावसाळा डिलिव्हरी एजंटसाठी फायदेशीर ठरला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world