जाहिरात

Dog Cat Fight : 'पतीला सोडेल, पण मांजराला नाही'! कुत्र्या-मांजरामुळे पती-पत्नीमध्ये दुरावा; घटस्फोटासाठी धाव

Husband Wife Seperation for Dog and Cat: भोपाळमध्ये लग्नानंतर अवघ्या 9 महिन्यात नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा निर्माण झालाय. याचं कारण कुत्रा आणि मांजर आहे.

Dog Cat Fight : 'पतीला सोडेल, पण मांजराला नाही'! कुत्र्या-मांजरामुळे पती-पत्नीमध्ये दुरावा; घटस्फोटासाठी धाव
Husband Wife Seperation : या जोडप्यानं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
मुंबई:

Husband Wife Seperation for Dog and Cat: आपल्या देशात सामान्यपणे घटस्फोटासाठी हुंड्याची मागणी, घरगुती हिंसाचार, घरगुती तणाव किंवा जोडीदारापैकी एकाचे विवाहबाह्य संबंध ही कारणं असतात. पण, मध्य प्रदेशचे राजधानी भोपाळमध्ये घटस्फोटाचा एक खटला सुरु आहे. यामधील कारण अजब आहे. भोपाळमध्ये लग्नानंतर अवघ्या 9 महिन्यात नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा निर्माण झालाय. याचं कारण कुत्रा आणि मांजर आहे. या जोडप्याने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केलाय, 

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक विचित्र घटस्फोटाचे प्रकरण समोर आले आहे. हे जोडपं आयटी क्षेत्रामध्ये काम करतं. त्यांच्यातील दुराव्यामध्ये कोणताही कौटुंबिक हिंसा किंवा तणाव नाही. तर एक कुत्रीा आणि मांजर आहे. 

काय आहे प्रकरण?

या दाम्पत्याची ओळख सोशल मीडियावर झाली होती, कारण दोघेही ‘पेट लव्हर्स' होते. याच आवडीमुळे त्यांची मैत्री झाली आणि पुढे त्यांनी लग्न केले. मात्र, लग्नानंतर त्यांच्या पाळीव प्राण्यांमधील भांडणांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.

पत्नीनं केलेल्या आरोपानुसार तिच्या नवऱ्याचा कुत्रा मांजराला वारंवार त्रास देतो. त्याच्यावर हल्लाही करतो. ज्यामुळे मांजर घाबरून राहते. पत्नीने स्पष्टपणे सांगितले आहे की ती पतीला सोडून देईल, पण आपल्या मांजराला नाही.

( नक्की वाचा : Pune Traffic: पुण्यात बैलपोळा मिरवणुकीमुळे 9 वर्षांच्या मुलाचा जीव टांगणीला; 'आई'ने मांडला थरारक अनुभव... )
 

नवऱ्यानं मात्र बायकोचे सर्व आरोप फेटाळले. बायको तिचे सर्व पाळीव प्राणी सोबत आणणार नाही, हे आमचं लग्नापूर्वीच ठरलं होतं. तरीही तरीही ती मांजराला माहेरहून घेऊन आली. हे मांजर घरातील माशांना त्रास देतं असा दावाही नवऱ्यानं केलाय. 

या प्रकरणातील  पती ‘वर्क फ्रॉम होम' (WFH) करतो, तर पत्नी भोपाळमध्ये नोकरी करते. पत्नी मूळची उत्तर प्रदेशची आहे आणि तिने काही इतर पाळीव प्राणी माहेरीच सोडले आहेत. मात्र, या एका मांजराला सोडायला ती अजिबात तयार नाही. दोन्ही कुटुंबांनी आणि समुपदेशकांनी समजावण्याचा प्रयत्न करूनही ते निष्फळ ठरले आहेत, कारण दोघेही आपापल्या पाळीव प्राण्यांबाबत इतके भावनिक आहेत की कोणताही तोडगा काढायला तयार नाहीत.

फॅमिली काउन्सलर शैल अवस्थी यांनी या प्रकरणावर बोलताना सांगितले की, आजच्या पिढीमध्ये एकटेपणा वाढत आहे आणि लोक नाती गंभीरपणे घेत नाहीत. त्यांना वाटते की ते आपल्या पाळीव प्राण्यांसोबतही राहू शकतात. अशा परिस्थितीत, पती-पत्नीमधील लहान-सहान गोष्टींवरूनही तणाव वाढत आहे आणि त्यामुळेच घटस्फोटाची अशी विचित्र प्रकरणे समोर येत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com