
Chief Justice of India Bhushan Gavai : अमरावतीचे सुपूत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई 14 मे रोजी भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. भूषण गवई हे भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना राष्ट्रपती भवनात भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ देतील.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यावेळी नवे सरन्यायाधीश कोण असतील याबाबत बरीच उत्सुकता होती. ज्यावर आता निर्णय घेण्यात आला आहे. भारताच्या नव्या सरन्यायाधीशपदावर भूषण गवई असतील. भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात अनेक चांगल्या गोष्टी सुरू केल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यांनी जनहित याचिकेच्या सुनावणीसाठी आठवड्यातील एक दिवस निश्चित केला आहे. सर्वसामान्यांसाठीही त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण आदेश पारित केले. यासोबतच उत्तर प्रदेशातील आरोपींच्या घरांवर बुलढोझर चालविण्याच्या कारवाईवरुन त्यांनी सरकारला फटकारलं होतं.
नक्की वाचा - Tahawwur Rana : पाकिस्तानी लष्कर, ISI आणि भारतविरोध पहिल्याच दिवशी राणानं सांगितली कोणती रहस्य?
अमरावती आणि नागपुरसोबत खास कनेक्शन...
बुलढोझर कारवाईवरुन सरकारला फटकारलं...
न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात अनेक गोष्टी सुरू केल्या. त्यांनी जनहित याचिकेसाठी आठवड्याचा एक दिवस निश्चित केला. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारला बुलढोझर कारवाईवरुन फटकारलं. सर्वोच्च न्यायालयात वकील न्यायमूर्तींसमोर मोठ्या आवाजात बोलत होते. त्यांनी यावर आक्षेप नोंदवला आणि वकिलांना कडक शब्दात फटकारलं. ते नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य आहेत, जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले. यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश झाले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world