दिल्ली कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात आप नेते 'निर्दोष'; अरविंद केजरीवाल ढसाढसा रडले!

Liquor Policy Case: दिल्ली मद्य धोरण प्रकरणात पुराव्यांच्या अभावी राऊज एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Delhi News: दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित सीबीआय प्रकरणात आम आदमी पार्टीच्या (AAP) नेतृत्वाला मोठा दिलासा मिळाला आहे.  राऊज एव्हेन्यू कोर्टाच्या विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि विजय नायर यांना सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले आहे. सीबीआयने सादर केलेल्या आरोपपत्रात अनेक त्रुटी असून, कोणताही गुन्हेगारी कट किंवा ठोस पुरावा सिद्ध करण्यास तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. यावर प्रतिक्रिया देताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले. 

न्यायालयाची महत्त्वपूर्ण निरीक्षणे

न्यायालयाने आपला निकाल देताना सीबीआयच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणात कोणताही 'क्रिमिनल इंटेंट' (गुन्हेगारी हेतू) किंवा व्यापक कट रचल्याचे दिसून येत नाही. मनीष सिसोदिया यांच्याविरोधात प्रथमदर्शनी कोणताही खटला बनत नाही.

(नक्की वाचा-  Rinku Singh's Father: रिंकू सिंहवर दुःखाचा डोंगर! वर्ल्ड कपदरम्यान वडिलांचे निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी)

केजरीवाल यांना विनाकारण ओढले 

अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही ठोस साहित्याशिवाय किंवा पुराव्याशिवाय या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. न्यायालयाने सीबीआयला फटकारताना म्हटले की, "तपास यंत्रणा योग्य, तार्किक आणि निष्पक्ष तपास करण्यात अपयशी ठरली आहे. जोपर्यंत तपास निष्पक्ष नसतो, तोपर्यंत निष्पक्ष खटला चालवणे शक्य नाही." सविस्तर आरोपपत्रात अनेक त्रुटी आहेत आणि एकाही साक्षीदाराच्या जबाबातून हे आरोप सिद्ध होत नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले.

(नक्की वाचा-  Pune News: पुण्यात पासपोर्ट कार्यालय उडवण्याची धमकी! 'RDX' वापरण्याचा ईमेलमध्ये उल्लेख)

"आम्ही सगळे प्रामाणिक आहोत"

या निकालानंतर 'आप'मध्ये आनंदाचे वातावरण आहे. निकालावर प्रतिक्रिया देताना अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की, "आमच्यावर जाणीवपूर्वक चिखलफेक करण्यात आली. आमचे पाच महत्त्वाचे नेते जेलमध्ये टाकले गेले. मात्र, आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केल्याचे फळ आज मिळाले आहे. अखेर सत्यचा विजय झाला. निकालवर प्रतिक्रिया देताना अरविंद केजरीवाल ढसाढसा रडले.
 

Advertisement
Topics mentioned in this article