जाहिरात

Big Relief: गॅस कंपनीच्या मनमानीला आता फुलस्टॉप! मोबाईल सिमप्रमाणे LPG कंपनी बदला, हे आहेत नवीन नियम!

सध्या कंपनी बदलणे शक्य नव्हते. फक्त एकाच कंपनीचे डीलर बदलता येत होते.

Big Relief: गॅस कंपनीच्या मनमानीला आता फुलस्टॉप! मोबाईल सिमप्रमाणे LPG कंपनी बदला, हे आहेत नवीन नियम!
नवी दिल्ली:

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक बोर्ड (PNGRB) देशातील एलपीजी ग्राहकांना मोठा अधिकार देण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार लवकरच ग्राहक मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) प्रमाणेच आपली सध्याची गॅस कंपनी बदलू शकतील. गॅस पुरवठादाराची खराब सेवा, डिलिव्हरीला होणारा विलंब किंवा डीलरची मनमानी या मुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या पुढच्या काळात जर तुम्ही एखाद्या गॅस कंपनीबाबत नाराज असाल तर तुम्ही तुमच्या आवडीची गॅस कंपनी निवडू शकणार आहात. ते तुमच्यासाठी अधिक सुलभ होणार आहे. 

सध्या पोर्टेबिलिटीची सोय एकाच कंपनीच्या वेगवेगळ्या डीलर्सपर्यंत मर्यादित होती. म्हणजे, एका कंपनीचा ग्राहक फक्त त्याच कंपनीच्या दुसऱ्या डीलरकडून रिफिल घेऊ शकत होता. PNGRB ही मर्यादा दूर करण्याची योजना आखत आहे. यामुळे ग्राहक नवीन कनेक्शन न घेता, केवळ आपल्या सेवेचा पुरवठादार बदलू शकतील. या नव्या पोर्टेबिलिटी पर्यायामुळे गॅस कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढेल, ज्यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेत सुधारणा होईल. खराब सेवा मिळाल्यास ग्राहक त्वरित दुसरी कंपनी निवडू शकतील.

नक्की वाचा - Dahanu News: रेल्वचे इंजिन सुसाट पुढे गेले, 2 डब्बे मागेच राहीले, अमृतसर एक्सप्रेसचा थरकाप उडवणार प्रसंग

एलपीजी सिलिंडर्सची किंमत जवळपास समान असल्याने, आता ग्राहक केवळ सेवेच्या आधारावर कंपनी निवडू शकतील. तातडीच्या वेळी किंवा डीलरकडे स्टॉक उपलब्ध नसल्यास, ग्राहक लवकरच जवळच्या कोणत्याही कंपनीच्या डीलरकडून सिलिंडर रिफिल करू शकतील. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी माहिती दिली होती की, 2014 मध्ये देशात 14 कोटी असलेले एलपीजी कनेक्शन आता 33 कोटींहून अधिक झाले आहेत. ग्राहकांची वाढती संख्या पाहता, सेवेचा दर्जा सुधारणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानुसारच हा निर्णय लवकर अपेक्षित आहे. 

नक्की वाचा - Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचे नाव जवळपास निश्चित, 'या' नावावर निर्णय शेवटच्या टप्प्यात

सध्या कंपनी बदलणे शक्य नव्हते. फक्त एकाच कंपनीचे डीलर बदलता येत होते. म्हणजेच, एचपी गॅसचा ग्राहक फक्त एचपीच्या दुसऱ्या डीलरकडे जाऊ शकत होता. आता PNGRB ही बोटचेपी अट हटवणार आहे. याचा अर्थ, तुम्ही नवीन कनेक्शन न घेता, खराब सेवा देणाऱ्या कंपनीला टाटा-बाय-बाय करून दुसरी चांगली कंपनी निवडू शकाल. ग्राहकाला सेवेवर आधारित कंपनी निवडण्याचा हक्क मिळणार आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com