जाहिरात

ऐकावे ते नवलचं! साप तरूणाला एकदा चावला 'तो'सापाला दोनदा चावला, साप मेला तो वाचला

एक अंधश्रद्ध आहे, की साप चावला तर त्याला आपण चावलं पाहीजे. तसे केल्यास सापाचं विष अंगात भिनत नाही.

ऐकावे ते नवलचं! साप तरूणाला एकदा चावला 'तो'सापाला दोनदा चावला, साप मेला तो वाचला
प्रतीकात्मक तस्वीर.
पाटणा:

बिहार (Bihar) मध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला साप एकदा (Snake Bite) चावला. त्यामुळे रागावलेल्या त्या व्यक्तीने सापाचाच दोन वेळा चावा घेतला. त्यानंतर तो साप मेला. ही घटना बिहारच्या नवादा इथे घडली. संतोष लोहार हे रेल्वेचे लाईनमन म्हणून काम करतात. त्यांचे काम झाल्यानंतर ते रेल्वेच्या बेस कॅम्पवर येवून झोपले. झोपेत असतानाच त्यांना साप चावला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संतोष लोहार हे बिहारच्या नवादा या भागात राहतात. या भागात एक अंधश्रद्ध आहे, की साप चावला तर त्याला आपण चावलं पाहीजे. तसे केल्यास सापाचं विष अंगात भिनत नाही. त्याचा कोणताही परिणाम शरीरावर होत नाही. या अंधश्रद्धेमुळेच संतोष याने टोकाचे पाऊल उचलले. जेव्हा साप त्याला चावला, त्यानंतर त्याने त्या सापाला पकडले. त्यानंतर दोन वेळा त्याचा त्याने चावा घेतला. त्यात तो साप मेला. त्यानंतर संतोषला मात्र जवळच्या रूग्णालयात दाखल करावं लागलं. संतोषच्या सहकाऱ्यांनी त्याला राजौलीच्या रूग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर संतोषची तब्बेत ठिक झाली आहे. शिवाय त्याला रूग्णालयातून सुट्टीही देण्यात आली आहे.  

ट्रेंडिंग बातमी - 'लोणावळा खंडाळा बंद करा, तुम्ही आमच्या पोटावर पाय आणला'

याआधीही उत्तर प्रदेशात अशीच काहीशी घटना घडली होती. उत्तर प्रदेशातल्या फतेहपूरमध्ये एका व्यक्तीला दोन महिन्यात पाच वेळा साप चावला. मात्र तरीही त्या व्यक्तीला काही झाले नाही. या घटनेनंतर डॉक्टरही आश्चर्य व्यक्त करत  आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - वजन कमी करण्यासाठी काय कराल? 'या' फळाचं करा सेवन 

जागतीक आरोग्य संघटनेने (WHO) नुसार साप चावल्यानंतर तातडीने पावलं उचलणे गरजेचे आहे. शिवाय डॉक्टरांची मदत घेणेही गरजेचे आहे. जर तात्काळ उपचार केले गेले नाहीत तर अपंगत्व किंवा मृत्यूही ओढवू शकतो. साप चावल्यानंतर त्या जागेपासून दुर जाणे गरजेचे आहे. शिवाय अंगावर जर घट्ट कपडे घातले असतील तर ते काढून टाका. अंगावर कोणत्याही स्वरूपाचे दागिनेही ठेवू नका. ज्या ठिकाणी साप चावला आहे ती जागा स्थिर ठेवा. त्या ठिकाणी रक्त चोखण्याचा प्रयत्न करू नका. शिवाय तातडीने त्याला डॉक्टरकडे घेवून जा. साप चावला असेल त्या व्यक्तीला काही खाण्यास किंवा पिण्यास देवू नका. शिवाय बर्फानेही तो भाग शेकू नका. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
J & K Exit Poll : जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनी झाल्या विधानसभा निवडणुका, एक्झिट पोलचा अंदाज काय?
ऐकावे ते नवलचं! साप तरूणाला एकदा चावला 'तो'सापाला दोनदा चावला, साप मेला तो वाचला
Noida  retired Major General  trap  cyber criminals Digital arrest  2 crores
Next Article
हॅलोsss मी मुंबई पोलीस बोलतो, एक फोन कॉल अन् निवृत्त मेजर जनरल झाला कंगाल