बिजनौर, उत्तरप्रदेश: चार दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये इनोव्हा कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत तीन तरुण आणि तीन तरुणींचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना ताजी असतानाच आता उत्तरप्रदेशच्या बिजनौरमधून एक भीषण अपघात झाला असून यामध्ये नववधु- वरासह सात जणांचा अंत झाला आहे. लग्न आटोपून येताना ही काळीज पिळवटून टाकणारी घडली.
उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे झालेल्या भीषण अपघातात वधू-वरांसह सात जणांचा मृत्यू झाला. धामापूर पोलीस ठाणे हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर कार आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली. लग्नसोहळा झाल्यानंतर नवरदेवाचे वराड वधूसोबत परतत असताना हा भीषण अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिजनौर रस्ता अपघाताची दखल घेतली. मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. याशिवाय जखमींना तातडीने रुग्णालयात नेऊन उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
नक्की वाचा: 'फक्त मुलीचा, भावाचा विकास...', सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार कडाडले
हे कुटुंब झारखंडमध्ये लग्न आटोपून रिक्षाने बिजनौर येथील आपल्या घरी परतत होते. यावेळी झालेल्या भयंकर अपघाताने लग्नघरात शोककळा पसरली. हे कुटुंब रिक्षाने जात असतानाच एका भरधाव क्रेटा कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडला. टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या वधू-वर आणि कुटुंबातील सहा सदस्यांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. उपचारादरम्यान टेम्पो चालकाचाही मृत्यू झाला. . वर विशाल आणि वधू खुशी, खुर्शीद, मुमताज, रुबी, बुशरा यांच्यासह कुटुंबातील चार जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
महत्वाची बातमी: 'तुझ्या नावावर मते माग...', अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांना खोचक टोला