जाहिरात

'फक्त मुलीचा, भावाचा विकास...', सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार कडाडले

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर तोफ डागली. रायगडच्या म्हसळा येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. 

'फक्त मुलीचा, भावाचा विकास...', सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार कडाडले

मेहबुब जमादार, रायगड: 'काही लोकांना संधी दिली मात्र त्यांना इथला विकास करायचा नाही. त्यांना कुटुंबाचा विकास करायचा आहे. स्वतःचा विकास, मुलीचा विकास, भावाचा विकास करायचा आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर तोफ डागली. रायगडच्या म्हसळा येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. 

काय म्हणाले शरद पवार? 

'लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला. 400 जागा हव्यात अशी भाजपने भूमिका घेतली. 400 जागा याचा अर्थ लोकसभा, सरकार चालवण्यासाठी ४०९ जागांची गरज नसते. 400 जागांची मागणी का करतात? त्यांचेच सहकारी सांगत होते घटनेत बदल करायचा आहे. तुमची आमची जबाबदारी आहे जी घटना आंबेडकरांनी लिहिली. तिच्यावर हल्ला करण्याची भूमिका मोदी घेत असतील तर त्यांच्या हातात सत्ता द्यायची नाही याचा निर्णय घ्यायचा आहे,' असे आवाहन शरद पवार यांनी केले.

नक्की वाचा: 'धार्मिक कलह..', वोट जिहादवरुन शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारले

'शेती मालाचा प्रश्न आहे. गेली 10, 12 वर्षे सत्ता भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांकडे आहे. लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले कारण निवडणूक जवळ आली. मागील 10 वर्षात लाडक्या बहिणीची आठवण नाही आली.आजचे युती सरकारच्या काळात महिला अत्याचार झाले 67 हजार 381 घटना झाल्या. बेपत्ता मुली राज्यात 64 हजार महिला बेपत्ता आहेत. लाडक्या बहिणीची ही स्थिती आहे. हजारो मुलं पदवीधर झाली, नोकरीचा पटा नाही. त्या मुलांमध्ये नैराश्य येत. हे समाजाच्या हिताचे नाही. म्हसळा तील तरुण आखाती देशात जातात ही चिंतेची बाब आहे, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

सुनील तटकरेंवर टीका

यावेळी बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. 'तुम्हाला मंत्री बनवलं, अन्य ठिकाणी संधी दिली. काही लोकांना संधी दिली मात्र त्यांना इथला विकास करायचा नाही. त्यांना कुटुंबाचा विकास करायचा आहे. स्वतःचा विकास, मुलीचा विकास, भावाचा विकास करायचा आहे. भाजपच्या विरोधात जे लढले. निवडून आल्यावर ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात ते जनतेची फसवणूक करतात. या फसवणूक करणाऱ्या लोकांचा पराभव करा,' असा घणाघात त्यांनी यावेळी केला. 

महत्वाची बातमी: 'तुझ्या नावावर मते माग...', अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांना खोचक टोला

Listen to the latest songs, only on JioSaavn.com