जाहिरात

Video : कंगना रणौतसोबत विमानतळावर गैरवर्तन, CISF जवानानं कानशिलात लगावली

Kangana Ranaut : नवनिर्वाचित भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतनं तिला कानशिलात लगावल्याचा दावा केलाय.

Video : कंगना रणौतसोबत विमानतळावर  गैरवर्तन, CISF जवानानं कानशिलात लगावली
नवी दिल्ली:


Kangana Ranaut : नवनिर्वाचित भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतनं तिला कानशिलात लगावल्याचा आरोप केलाय. कंगना नवी दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर आली होती. त्यावेळी सिक्युरिटी चेकच्या दरम्यान कॉन्स्टेबल रँकच्या CISF च्या महिला अधिकारी कुलविंद कौरनं आपल्याला कानशिलात लगावल्याचं कंगनानं सांगितलं. कंनानं शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान महिला शेतकऱ्यांबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्यावर नाराज होऊन या अधिकाऱ्यानं कंगनाला कानशिलात लगावली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कंगनानं केलेल्या या दाव्यानंतर खळबळ उडाली असून या प्रकरणात पुढील चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्यात आलीय, असं वृत्त ANI नं CISF च्या सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कंगना रनौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाली आहे. 

मंडीमधून विजयी झाल्यानंतर कंगनी नवी दिल्लीला जाण्यासाठी चंदिगड विमानतळावर आली होती. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. कंगना चंदिगडहून दिल्लीला दाखल झाल्यानंतर तिची या विषयावर प्रतिक्रिया घेण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला. त्यावेळी ती काहीही न बोलता निघून गेली. 

दरम्यान, कंगनानं नंतर या प्रकरणात एक व्हिडिओ शेअर केलाय. 'मी सुरक्षित आहे. हा प्रकार चेकिंगच्या दरम्यान घडला. महिला गार्ड माझी वाट पाहात होती. मी चेकिंगमधून पास होत असताना ती बाजूनं आली आणि तिनं मला मारलं. तिनं यावेळी मला जोरदार शिवीगाळ केली. मी तिला का मारहाण केली हे विचारलं त्यावर ती मी शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहे, असं सांगितलं. पंजाबमध्ये दहशतवाद वाढतोय, ही मला काळजी आहे.'

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com