Viral Video: तमिळनाडूतील एका घटनेमुळे माणुसकीचे उत्तम उदाहरण समोर आलंय. यासंदर्भात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होतोय. Blinkitच्या एका डिलिव्हरी रायडरने आपल्या सतर्क आणि संवेदनशील स्वभावामुळे असे काही करून दाखवले, जे कदाचित कोणतंही मशीन किंवा रोबोट करू शकला नसता. एक साधी डिलिव्हरी ऑर्डर अचानक जीवन आणि मृत्यूमधील संघर्ष ठरली.
उशीरा रात्री आलेली संशयास्पद ऑर्डर
Blinkitच्या डिलिव्हरी पार्टनरला रात्री उशीरा एक ऑर्डर मिळाली, ज्यामध्ये उंदरांना मारण्यासाठीच्या विषारी औषधांच्या तीन पाकिटांचा समावेश होता. त्यावेळेस कोणताही संशय व्यक्त न करता रायडल पत्त्यावर पोहोचला, पण ग्राहकाने दरवाजा उघडताच त्याला गोष्टी असामान्य असल्याचे आढळले. दरवाजा उघडणारी महिला खूपच अस्वस्थ दिसत होती आणि सतत रडत होती. तिची अवस्था पाहून डिलिव्हरी बॉयला संशय आला. महिलेने चुकीच्या हेतूने ऑर्डर मागवलं नसल्याचं सांगितलं तरीही रायडरचे मन तिचे म्हणणं ऐकायला तयार नव्हते.
माणुसकीने अल्गोरिदमपेक्षा घेतला मोठा निर्णय
डिलिव्हरी पार्टनरने त्या महिलेशी संवाद साधला आणि तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने म्हटलं की, कोणतीही समस्या कायमस्वरुपी नसते आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःला इजा करणे हा उपाय नाही. त्याने महिलेला थेट विचारले की, तिने हे विष स्वतःला नुकसान पोहोचवण्यासाठी मागवलंय का? यावर तिने नाही असे म्हटलं, पण तिचे वर्तन काहीतरी वेगळीच गोष्ट सांगत होते.
पाहा Video:
अन् ऑर्डर रद्द झाली
शेवटी रायडरने मोठा निर्णय घेतला. त्याने ऑर्डर रद्द केली आणि विषाचे पॅकेट्स स्वतःबरोबर परत नेले. नंतर त्याने ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं की, आज काहीतरी चांगले केलंय.
सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षावही घटना समोर येताच सोशल मीडियावर लोकांनी Blinkitच्या रायडरचे कौतुक केले. एका युजरने लिहिले,"एखादा रोबोट असता तर तो सरळ डिलिव्हरी करून गेला असता." दुसऱ्याने म्हटले, “Blinkitचा अल्गोरिदम डिलिव्हर करण्यास सांगत होता, पण त्यांच्या आत्म्याने थांबवलं" आणखी एका युजरने लिहिले,"त्याने फक्त ऑर्डर नाही, तर माणूस पाहिला. हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे."
(नक्की वाचा: Zomato CEO : झोमॅटोचे CEO दीपिंदर गोयल स्वतःच्या मेंदूवर करतायेत अभ्यास, या डिव्हाइसला काय म्हणतात, ते काय काम करतं?)
सन्मान करण्याची मागणीअनेक सोशल मीडिया युजर्सनी Blinkit व्यवस्थापनाकडे मागणी केली की या डिलिव्हरी पार्टनरचा औपचारिक स्वरुपात सन्मान केला जावा. त्याच्या समजूतदारपणामुळे आणि संवेदनशीलतेमुळे कदाचित एका व्यक्तीचा जीव वाचला असावा, असे मत अनेकांनी मांडलंय.
माणुसकी जिवंततंत्रज्ञानाच्या युगातही मानवी भावना सर्वांत महत्त्वाच्या आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. कधी कधी एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी नियमांपेक्षा जास्त गरजेचे असते ते म्हणजे आपल्या मनाचा आवाज ऐकणे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
