BSNL Launched Satellite to Device: भारतात D2H सेवा सुरू झाली होती, जी आपल्याला माहिती आहे. मात्र देशात पहिल्यांदा D2D (Direct to Device) सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा वापरून ग्राहकांसाठी ती राबवणारी BSNL ही पहिली कंपनी बनली आहे. बीएसएनएलच्या 'सॅटेलाईट-टू-डिव्हाइस' सेवेमुळे ज्या भागात नेटवर्क मिळत नाही असा कोणत्याही भागात विनाअडथळा कॉलिंग सेवा उपलब्ध होणार आहे. बीएसएनएलने D2D (BSNL D2D) या तंत्रज्ञानासाठी कॅलिफोर्नियातील कंपनी वायासॅटसोबत हातमिळवणी केली आहे. ही नवी सेवा सुरू झाल्याची माहिती दूरसंचार विभागाने एक्सवर पोस्ट करत दिली आहे. त्यामुळे आता मोबाईलमध्ये सिमकार्ड नसलं, किंवा रिचार्ज नसला तरी ग्राहकाला मोबाईलवरून फोन करता येईल किंवा कॉल घेता येईल.
BSNL launches India's 1st Satellite-to-Device service!
— DoT India (@DoT_India) November 13, 2024
Seamless connectivity now reaches India's remotest corners. pic.twitter.com/diNKjaivFo
(नक्की वाचा: मतदानापूर्वी वोटिंग कार्ड तुमच्या मोबाइल क्रमांकाशी करा लिंक, जाणून घ्या ही सोपी पद्धत)
बीएसएनएलने पोस्ट केलेल्या एक्स (X) मिडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमधील या सेवेची माहिती देणारी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जिथे नेटवर्कचा एकही सिग्नल प्राप्त होत नाही, इंटरनेट सर्फिंग सोडा, साधा कॉलही लागत नाही अशा भागातही ग्राहकांना विनाव्यत्यय कॉलिंग सेवा मिळू शकेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाच्या फोनमध्ये सॅटेलाईट टू डिव्हाईसला पूरक असणारी यंत्रणा असणे गरजेचे आहे.
(नक्की वाचा: Rohit Sharma : मुलाच्या जन्मानंतर रोहितची पहिली प्रतिक्रिया, शेअर केला खास Photo)
मोबाईल नेटवर्क किंवा वाय-फाय उपलब्ध नसेल तरीही या सेवेमुळे कॉलिंग सेवा मिळते. कॉलिंगसह या सेवेच्या माध्यमातून इमर्जन्सी मेसेजही पाठवला जाऊ शकतो. याशिवाय युपीआय पेमेंटही केले जाऊ शकते. भारतात पहिल्यांदाच बीएसएनएलने फायबर आधारित इंट्रानेट टीव्ही सेवा सुरु केली आहे. या सेवेला 'आयएफटीव्ही' असं नाव दिलं आहे. यामुळे ग्राहकांना लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि पे टीव्ही सुविधा मिळते. त्याचबरोबर ग्राहकांना ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील शो किंवा चित्रपटही पाहाता येतात. यात लवकरच अमेझॉन प्राईम व्हिडीओ, डिस्ने हॉटस्टार, नेटफ्लिक्स, युट्यूब आणि झी 5 चाही समावेश केला जाईल असे बीएसएनएलतर्फे सांगण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world