Mobile Number link with Voting Card: आधारकार्डप्रमाणेच मतदार ओळखपत्र हे देखील महत्त्वाच्या दस्ताऐवजांपैकी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मतदानासाठी मतदान ओळखपत्र गरजेचं आहेच. मात्र, मतदानाव्यतीरिक्त अनेक सरकारी, खाजगी कामांसाठीही मतदान ओळखपत्राची गरज लागते. त्यामुळे मतदान ओळखपत्र हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. तदार ओळखपत्रावरील माहिती अपडेट करण्यासाठी प्रत्येकवेळी लांबलचक रांगेत उभ राहण्यापेक्षा, घरबसल्या अवघ्या काही मिनिटांत मतदार ओळखपत्राशी मोबाईल नंबर लिंक करा. ज्यामुळे, व्होटर कार्डशी संबधित माहिती ऑनलाइन अपडेट करणं होईल सोप्प.
(नक्की वाचा: यंदा विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक अपक्ष, मुस्लीम मतांचं विभाजन होण्याची भीती)
विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अनेकांना मतदान करण्याची, मतदानाचा हक्क बजावण्याची इच्छा असते. मात्र मतदान ओळखपत्र नसल्याने मतदान करता येत नाही. पण, अनेकांकडे मतदान ओळखपत्र असले तरी, मतदान करता येत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे, मतदान ओळखपत्रावरील चूका किंवा मतदार ओळखपत्र हरवले असेल तर, ते पुन्हा कढण्यासाठी बऱ्याचदा टाळाटाळ केली जाते. पण आता असे होणार नाही.
आता घरबसल्या अवघ्या काही मिनिटांत मतदार ओळखपत्राशी मोबाईल नंबर लिंक करता येईल. ज्यामुळे, व्होटर कार्डशी संबधित माहिती ऑनलाइन पद्धतीने अपडेट करणं सहज शक्य होईल. ज्यामुळे तुम्हाला मतदानाचा हक्क बजावण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हरवलेले मतदान कार्ड ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करण्यासाठी त्यचबरोबर मतदान कार्डमध्ये काही बदल करायचे असल्यास मतदान कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणं आवश्यक आहे. त्यामुळे जाणून घेऊयात, मतदार ओळखपत्राला मोबाईल नंबर कशाप्रकारे लिंक करायचा?
(नक्की वाचा: सरन्यायाधीशांना सापडेना हरवलेलं घर, नवे CJI संजीव खन्नांची हृदयस्पर्शी स्टोरी, एकदा वाचाच)
सर्वप्रथम, https://www.nvsp.in या ऑफिशियल नॅशनल वोटर्स सर्व्हिस वेबसाईटवर जाऊन, तुमच्या मोबाईल नंबर, ई-मेल, पासवर्ड त्याचबरोबर कॅप्चा कोड फील करून लॉगिन करा. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर पासवर्ड सेट करण्यासाठी एक ओटाीपी येईल. तो ओटीपी समोर जे पेज ओपन होईल त्या पेज वर टाईप करा. त्यानंतर आणखी एक नविन पेज ओपन होईल. जर तुम्हाला नविन मोबाईल नंबरने रजिस्टर करायचे असले तर, तो नंबर तिथे टाका. किंवा जो मोबाईल नंबर आधीपासूनच रजिस्टर आहे, तो बदलण्यासाठी होमपेज वर 8 क्लिक करा. त्यानंतर सेल्फ या पर्यायावर क्लिक करून, सबमिट करा. मग Other ऑप्शनवर जाऊन Epic नंबर भरा. आणि सबमिट करा. त्यानंतर तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा मेल टाकून Next वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही भरलेली माहिती किंवा दुरुस्त केलेली अचूक आहे की नाही एकदा चेक करून घ्या. आणि सबमिट बटणवर क्लिक करा. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 48 तासांनंतर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केला जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world