जाहिरात

तेलुगु सुपरस्टार नागार्जुनाच्या घरावर बुलडोझर, वाचा का केली कारवाई?

हैदराबाद डिझास्टर रिस्पॉन्स अँड असेट्स मॉनिटरिंग अँड प्रोटेक्शननं (हायड्रा) तेलुगु सुपरस्टार नागार्जुनच्या एन-कन्व्हेन्शन सेंटरवर बुलडोझर चालवला आहे.

तेलुगु सुपरस्टार नागार्जुनाच्या घरावर बुलडोझर, वाचा का केली कारवाई?
मुंबई:

दराबाद डिझास्टर रिस्पॉन्स अँड असेट्स मॉनिटरिंग अँड प्रोटेक्शननं (हायड्रा) तेलुगु सुपरस्टार नागार्जुनच्या एन-कन्व्हेन्शन सेंटरवर बुलडोझर चालवला आहे. 10 एकर जागेत पसरलेल्या या सेंटरची गेल्या अनेक वर्षांपासून चौकशी सुरु होती. हे सेंटर मधापूर भागातील थम्मीदीकुंता तलावाच्या बफर झोनमध्ये होते. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

हायड्रानं शनिवारी या सेंटरवर बुलडोझरनं कारवाई केली. या कारवाईच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, अशी माहिती मधापूच्या पोलीस अधिक्षकांनी दिली. यामधील कन्व्हेन्शन हॉल 2 एकर बफर झोनमध्ये होता. यापूर्वी अधिकाराचा गैरपावार करुन ग्रेटर हैदराबाद नगर निगमला या हॉलवर कारवाई करण्यापासून रोखण्यात आलं होतं, अशी माहिती आता समोर आली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार भास्कर रेड्डी यांनी हे सेंटर पाडण्यात यावं तसंच या भागातील तलाव पुन्हा खुला करावा अशी मागणी केली होती. या कारवाईच्या दरम्यान तलावाच्या दिशेनं जाणारा रस्ता देखील बंद करण्यात आला होता. 

( नक्की वाचा : चित्रपटाच्या बदल्यात लैंगिक शोषण, एन्ट्रीसाठी कोड नेम! सिनेमाच्या सर्वात 'डर्टी पिक्चर'च काळं सत्य )
 

या सेंटरचा मालक नागार्जुनचा तेलगु इंडस्ट्रीसह अनेक क्षेत्रांमध्ये प्रभाव आहे. या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 3 सभागृह होते, असं सांगितलं जातं. राजकीय सभा तसंच उद्योगपती आणि अभिनेत्यांच्या लग्नासाठी या हॉलचा वापर होत असे. यापूर्वी हैदराबाद महानगरपालिका, जलसिंचन विभाग, महसूल विभागासह अनेक सरकारी यंत्रणांनी या सेंटरच्या बांधकामाची चौकशी केली होती. या सेंटरचा तलावासारख्या नैसर्गिक जलस्रोताला फटका बसतोय, असं या तपासामध्ये आढळलं होतं.

तेलुगु सुपरस्टार नागार्जुननं आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यानं 1967 सालीच बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं. नागार्जुनचे वडील नागेश्वर राव देखील प्रसिद्ध अभिनेते होते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com